शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याकडे डिग्री नाही, पण ज्ञान आहे. कसं वाटू?

By admin | Updated: April 12, 2017 18:54 IST

करिअरच्या संदर्भात अनेक तरुण आम्हाला अनेक प्रश्न विचारतात. एकदा एक विद्यार्थी आमच्याकडे आला. मनोज त्याचं नाव. त्याचा प्रश्न अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा होता.

- पूर्वी दवे(दिशा कौन्सेलिंग सेंटर)करिअरच्या संदर्भात अनेक तरुण आम्हाला अनेक प्रश्न विचारतात. एकदा एक विद्यार्थी आमच्याकडे आला. मनोज त्याचं नाव. त्याचा प्रश्न अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा होता.त्याचं म्हणणं होतं, मुंबई विद्यापीठातून मी बीकॉमच्या पदवीचं शिक्षण घेतो आहे. मला शिक्षक बनायचं आहे. गणित विषय मला अतिशय आवडतो. त्यात मला चांगली गती आहे आणि हा विषय मी मुलांना उत्तम शिकवूदेखील शिकतो. हा विषय मी शाळेतल्या मुलांना शिकवतोही आहे, पण त्या विषयाची डिग्री माझ्याकडे नाही. हा विषय विद्यार्थ्यांना मला शिकवायचा तर आहे. मी काय करू?त्याचं म्हणणं अगदी बरोबर होतं आणि आहे, पण कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायचं तर त्यासाठी अधिकृत पदवी घेतलेली केव्हाही चांगलं. कारण त्यानंतर त्यात तुम्हाला प्रगतीचीही संधी असते. आता मनोजच्या संदर्भात त्यानं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याला बीएडची पदवी घेता येईल. बीएड केल्यानंतर शाळेतल्या मुलांना शिकवण्याची अधिकृत पात्रता त्याला मिळते. बीएडसाठी अगोदर बीएडची सीईटी द्यावी लागेल. बीएड हा सध्या दोन वर्षांचा फूलटाईम कोर्स आहे. उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले हवेत. त्यानंतर तो बीएडसाठी पात्र ठरू शकतो.