शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

आय लायनर परफेक्ट कसं लावायचं?

By admin | Updated: February 19, 2015 19:31 IST

अनेक मुलींच्या मनात एक खूटखूट असते. आपल्याला चांगलं आय लायनर लावता येत नाही. आणि महत्त्वाकांक्षाही की, एक दिवस आपण परफेक्ट आय लायनर लावूच शकू !

लीना खांडेकर, ब्युटि एक्सपर्ट - 
अनेक मुलींच्या मनात एक खूटखूट असते. आपल्याला चांगलं आय लायनर लावता येत नाही. आणि महत्त्वाकांक्षाही की,  एक दिवस आपण परफेक्ट आय लायनर लावूच शकू !
ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची आणि परफेक्ट आय लायनर लावायला शिकायचं तर या काही परफेक्ट गोष्टी तुम्ही अचूक करा.
आय लायनर नक्की उत्तम लावता येईल. 
१) अनेक रंगांचे आय लायनर हल्ली मिळतात. ब्राउन, ब्लॅक, ग्रीन, नेव्ही ब्ल्यू यापैकी काहीतरी ट्राय करून पहावं असं वाटतं. पण, नेमकं घ्यायचं कोणतं? त्यासाठी सोपा नियम म्हणजे आपल्या ड्रेसप्रमाणे आय लायनरचा वापर करावा. 
२) पंजाबी ड्रेसवर साधारणत: ब्लॅक, ब्राउन लायनर छान दिसतात. वेस्टर्न अथवा इंडोवेस्टर्न ड्रेसेसवर बाकीचे रंग उठून दिसतात. कपड्यांना मॅचिंग असं आय लायनरही लावता येतंच.
३)  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे निवडलेलं आयलायनर आपण लावणार कसं? तुमचे डोळे लहान असतील, तर आयलायनर हे डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूनं लावावं. थोडं जाडसर लावावं. आतल्या बाजूनं काजळ लावावं. काजळाची रेषही जाडसर असावी म्हणजे डोळे मोठे दिसतील!
४) पापण्या बारीक अथवा विरळ असल्यास काजळ जाडसरच लावावं, त्यानं डोळ्यांचा आकार मोठा आणि सुंदर दिसतो. 
५) डोळे मोठे असतील तर मध्यमसर जाड लायनर लावावं. फार जाड लावू नये, नाहीतर डोळे अतीच मोठे दिसतात.
६) लायनर लावताना खूप जणींना भीती वाटते की, ते नीट लागत नाही. हात थरथरतो. पण आजकाल खूप छान जेल लायनर मिळतात. ते अगदी पेन्सिलीसारखे लागतात. त्यानं डोळ्याच्या वरच्या पापणीला लागून लायनर लावावं, त्यामुळं  डोळे जास्तीतजास्त उठून दिसतील.
७) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस, तुम्हाला लायनर लावणं खरंच खूप आवडत असेल, तर सराव करा, मस्त छान आय लायनर थोड्याच दिवसांत नक्की लावता येईल!