शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

हॉट जॉब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 4:35 PM

समजा एखाद्या कंपनीला आपल्या नूडल्सची किंवा लोणच्याची जाहिरात करायची आहे, अशा वेळी कॅमेºयासमोर हे नूडल्स किंवा लोणचं अत्यंत आकर्षक दिसावं लागेल. वाफाळलेले, मऊ नूडल्स किंवा लालबुंद खाराचं लोणचं ‘बघताच’ प्रेक्षकांची भूक चाळवावी लागेल.

- आॅक्सिजन टीम

डोकं आणि हात उत्तम चालवता येणा-यांसाठी कधी नव्हत्या अशा नव्या संधी..समजा एखाद्या कंपनीला आपल्या नूडल्सची किंवा लोणच्याची जाहिरात करायची आहे, अशा वेळी कॅमेºयासमोर हे नूडल्स किंवा लोणचं अत्यंत आकर्षक दिसावं लागेल. वाफाळलेले, मऊ नूडल्स किंवा लालबुंद खाराचं लोणचं ‘बघताच’ प्रेक्षकांची भूक चाळवावी लागेल.ज्यांचे फोटो काढायचे आहेत किंवा शूटिंग करायचं आहे, असे पदार्थ कॅमे-यासमोर आकर्षक दिसावेत म्हणून क्लृप्त्या लढवतो, त्यासाठीची क्रोकरी, रंगसंगती, आजूबाजूची सजावट हे सगळं ठरवतो, तो फूड स्टायलिस्ट!पायल गुप्ता सध्याची लीडिंग ‘फूड स्टायलिस्ट’ आहे.कोणती कौशल्यं लागतात?१. स्वयंपाकाची आवड हवी.२. कलेची आवड, रंगसंगती, रेषा, रुप, आकार यांची चांगली समज अत्यावश्यक.३. अत्यंत तणावाच्या परिस्थितीत डोकं शांत ठेवून उत्तम काम करता येणं मस्ट!४. जगभरातल्या फूड फोटोग्राफीचे बदलते टेÑण्ड्स, बदलती लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्यातली प्रयोगशीलता याकडे बारीक लक्ष हवं.नेमकं काम काय असतं?उत्पादक कंपनी आणि त्यांच्यासाठी काम करणारी जाहिरात एजन्सी किंवा डिझायनर्स या दोघांच्याही कल्पनेतला अन्नपदार्थ त्याच रंगरुपात तयार करून आकर्षकपणे सजवून शूटिंगसाठी ठरल्या वेळेत उपलब्ध करणं हे मुख्य काम.अनेकदा कॅमेºयासाठी लागणाºया प्रखर लाइट्सच्या उष्णतेमुळे अन्नाचा पोत बिघडतो (उदाहरणार्थ आइस्क्रीम वितळून जाणं). असं होऊ नये यासाठी युक्त्या लढवणं हेही फूड स्टायलिस्टचं काम आहे.हवा तो रंग आणि पोत मिळण्यासाठी अनेकदा पदार्थ पुन्हा पुन्हा बनवावे, सजवावे लागतात. आपण जे करू त्यात नावीन्य शोधावं लागतं.कधी कधी १६-१७ तास खपून एखादी असाइनमेण्ट पूर्ण होते. कधी कधी रात्री उशिरापर्यंत शूट चाललेलं असतं. दुपारी केलेला, सजवलेला पदार्थ रात्री उशिरापर्यंत तसाच कसा दिसेल? त्याचं टेक्श्चर बदलतं. तेव्हा पुन्हा अवघ्या काही मिनिटांत पदार्थ करायची आणि सजवायची कसरत करावी लागते.क्लायंटसाठी फूड स्टायलिस्ट हा एक जादूगार असतो. साध्याशा, नेहमीच्या पदार्थाला पाहताक्षणी घ्यावासा, खावासा वाटेल असं सुंदर रुप देण्याची जादू त्याला अवगत असावी लागते.भविष्यात ‘स्कोप’ किती आहे?सोबतच्या फोटोत दिसते ती पायल गुप्ता सध्याची लीडिंग ‘फूड स्टायलिस्ट’ आहे. पायल सांगते, ‘या अनोख्या करिअरच्या जगात मी काम सुरू केलं, तेव्हा आम्ही पाच-सहा जणच होतो. आता मुंबईतच ही संख्या अडीचशेच्या वर आहे. या करिअरमध्ये उत्तम पैसा आणि खूप संधी आहेत, कारण भारतीय लोक जसजसे जगभरात फिरू लागले आहेत, तसतशी त्यांना वेगवेगळ्या अन्नपदार्थांची, त्यांच्या मांडणी आणि सजावटीची ओळख होऊ लागली आहे. म्हणूनच आपल्याकडच्या जाहिरातीत दिसणारे पदार्थ, पेयं, मसाले, लोणची यांचं रुप किती बदललंय पाहा.

फूड इंडस्ट्रीमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. साध्या मसाल्यांचेच किती ब्रॅण्ड आहेत. प्रत्येक ब्रॅण्डला त्यांचा मसाला आकर्षक दाखवायचा असेल तर तो पदार्थ वेगळ्या आणि आकर्षक स्वरूपात दाखवणाºया फूड स्टायलिस्टची गरज लागणार आणि वाढणारच!’अगदी सिनेमा, सिरियल्स, वेबसिरीज, खाद्यपदार्थांसाठीच वाहिलेली चॅनल्स, यू ट्यूब सिरीज अशा असंख्य क्षेत्रात यापुढे फूड स्टायलिस्टना संधी मिळेल.ट्रेनिंग कुठे मिळेल?फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना हा वेगळा मार्ग धरणं जास्त सोपं जाऊ शकेल.बाकी आवश्यक स्किल्स असलेल्या कुणालाही या क्षेत्रात मोठ्या संधी मिळू शकतील. फूड स्टायलिस्ट बनू पाहणाºयांनी सतत कुकिंगमध्ये प्रयोग करायला हवेत. त्याचे फोटो काढून बघायला हवेत. कारण साध्या डोळ्यांनी दिसणारा पदार्थ कॅमेºयाच्या डोळ्यातून वेगळा दिसतो. तो कॅमेºयाच्या डोळ्याला आकर्षक वाटेल असा बनवण्याची धडपड सतत करायला हवी.फूड स्टायलिस्टला फक्त पदार्थ बनवता आणि सजवता येऊन चालत नाही, त्याला क्रोकरीचीही उत्तम जाण हवी.