शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

GF/BF ऑन रेण्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 07:00 IST

फेसबुकनंही डेटिंग फीचरची सेवा आणण्याचं ठरवलंय. ऑनलाइन डेटिंगसाठी याआधी टिंडर हे अ‍ॅप उपलब्ध होतं. आता फेसबुक डेटिंग फीचर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. का?

ठळक मुद्देबडय़ा शहरांत डेटिंग फीचरचा मोठा ट्रॅप लागलाय आणि त्यात अनेक तरुण-तरुणी फसत आहेत.

-प्रज्ञा केळकर-सिंग

लाइफ जाम बोअरिंग झालीये यार..मजा नाही, मस्ती नाही. सिर्फकाम और काम.’‘का रे? कॉर्पोरेट कंपनीत काम करतोस, बक्कळ पैसा कमावतोस. घरची जबाबदारी नाही. मग बोअर का होतंय?’‘बास का? नोकरी है, पर छोकरी नही है ना. नुसता पैसा असून काय उपयोग? एन्जॉयमेंट हवी की नाही काही. दिवसभर नुसती कामाची कटकट. गर्लफ्रेंड करायची म्हटली की कमिटमेंट अँड ऑल. काहीच कळेना. ’‘एक आयडिया सूचवू का? डेटिंग साइटशी कॉन्टॅक्ट कर. गर्लफ्रेंड ऑन रेंट. खाओ, पिओ, ऐश करो.’‘खरंच? असं करता येईल.’‘हो. मला मेसेज आलाय बघ. हॅलो, वाँट टू चॅट विथ मी, प्लीज कॉल फॉर डेटिंग, मीटिंग. या मेसेजमध्ये नंबरही दिला आहे. कर फोन.’‘भारीच रे. बोअरिंग आयुष्यात काहीतरी हॅपनिंग होईल!’***दोन मित्रांमधला हा संवाद. हा संवाद काल्पनिक वाटत असेल तर वास्तव याहून भीषण आणि विचार करायला लावणारं आहे. आयुष्य घडय़ाळाशी स्पर्धा करतंय आणि आपणही यंत्रासारखं धावतो आहोत. चांगल्या पगाराची नोकरी आहे, मनासारखी जीवनशैली आहे, पण एकटेपणा आ वासून उभाय. तरु णाईचा हाच एकटेपणा, कामातला ताणतणाव, त्यातून बाहेर पडण्याची धडपड आणि  एन्जॉयमेंटची गरज लक्षात घेऊन अनेक डेटिंग साइटनी मोठय़ा शहरांमध्ये आपलं जाळं पसरवलंय! ‘पैसा फेको, तमाशा देखो’ हे सूत्र धरून तात्पुरती मैत्रीण, फिरणं, गप्पा, हॉटेलिंग आणि सेक्स असं सगळं पुरवलं जातंय! हातात भरपूर पैसा खेळत असल्याने तरुण-तरु णी एकटेपणावरचा जालीम उपाय म्हणून या डेटिंग साइटकडे वेगानं आकर्षित होत आहेत.    पूर्वीच्या तुलनेत आयुष्याची सगळी गणितं बदलली. जगानं आपला वेग वाढवला आणि आपली आयुष्यही त्याच वेगाने धावू लागली. शिक्षण, नोकरी, करिअर यांना कमालीचं महत्त्व आलं आहे. करिअरसाठी अनेक तरु ण-तरु णी बाहेरगावी स्थायिक होतात. नामांकित कंपनीमध्ये नोकरी असल्यानं सुखासीन आयुष्य जगायला मिळतं. पण, घरापासून दूर राहताना येणारं नैराश्य हा मोठा प्रॉब्लेम बनतो आहे. नोकरीचे काही तास सोडले की इतर वेळी काय करायचं, कोणाशी बोलायचं असं कोडं समोर ठाकतं. ऑफिसमधले मित्र-मैत्रिणी तात्पुरते असतात. टीव्ही, मोबाइलवरचं व्हच्यरुअल जग आपला एकटेपणा नाहीच घालवू शकत. आपलं म्हणून वैयक्तिक आयुष्य जगताना मानसिक आणि  शारीरिक गरजा कशा पूर्ण करणार? अशी घालमेल सुरू असतानाच एखादा मेसेज अपग्यात आपल्या फोनवर येतो.तो म्हणतो, ‘‘हॅलो, वाँट टू चॅट विथ मी, प्लीज कॉल फॉर डेटिंग, मीटिंग’. उत्सुकतेने फोन केला की ‘हाय प्रोफाइल’ डेटिंगच्या नावाखाली विविध पॅकेजेसचा भडीमार, पैसे ऑनलाइन भरण्याची सोय, तुम्ही पैसे भरलेत की पाच मुलींचे फोटो तुम्हाला पाठवले जातील, असं सांगितलं जातं. एकटेपणा दूर करण्याच्या नादात अनेक तरु ण-तरुणी अशा आर्थिक आणि मानसिक फसवणूक करणार्‍या एजन्सीचे बळी ठरत आहेत. यातूनच शहरांमध्ये ऑनलाइन फसवणूक करणारं सेक्स रॅकेटचं जाळं विणलं जातंय.      फोनवरून त्यांना डेटिंग, मीटिंग, फिजिकल रिलेशनशिप याबाबतच्या मेंबरशिपची माहिती दिली जाते. एजन्सीच्या विविध पॅकेजना भुलणार्‍या तरु णांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या घटना यातून पुढे आल्या आहेत. ऑनलाइन पैसे भरायला सांगितल्यानंतर एजन्सीकडून आणखी काही पैशांची मागणी केली जाते. दोन-तीनदा पैसे भरून झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यास तरुणांची याबाबत विचारणा केली असता, संबंधित मोबाइल क्रमांक बंद करून टाकला जातो. अशा घटनांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलीस सातत्यानं करत आहेत.    समुपदेशकांच्या म्हणण्यानुसार, आयुष्यातील ताणतणाव आणि त्यातून येणारे नैराश्य, एकटेपणा ही सध्याची कळीची समस्या आहे. तरुणाईला वेगवान आयुष्य जगण्याची सवय लागली आहे. एन्जॉयमेंटच्या व्याख्या आणि समीकरणं बदलली आहेत. त्यातून तरुण अशा फसवणुकीचे बळी ठरत आहेत. नैराश्याला वाट करून देण्यासाठी असे पर्याय निवडले जातात; मात्र त्यातून डोकेदुखी आणखीनच वाढते. घरापासून दूर राहत असलो तरी संवादाचे पूल निकामी होता कामा नयेत, असं समुपदेशकांचं म्हणणं आहे. मनमोकळा संवाद हे आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवरचं निराकरण होऊ शकतं. आवडीचं नाटक, सिनेमे पाहणं, आवडीचे छंद जोपासणं, पर्यटनस्थळांना भेटी देणं, आवडीच्या कलेमध्ये रममाण होणं यातून नैराश्य दूर होऊ शकतं. त्यासाठी मनाची सकारात्मकता आणि उभारी मात्र सर्वात महत्त्वाची!

*** 

डेटिंग अ‍ॅपचा चक्रव्यूह

    मूळ समस्या आहे एकटेपणाची आणि त्यावर उपाय तो डेटिंगचाच असं मानणार्‍यांची. त्यासाठी डेटिंग साइट्सबरोबरच डेटिंग फीचर्सचाही उपयोग केला जात आहे. फेसबुकच्या सर्वेक्षणानुसार जवळपास 2 अब्ज लोक हे एकटे आहेत. त्यांच्यासाठी फेसबुकनंही डेटिंग फीचरची सेवा आणण्याचं ठरवलंय. ऑनलाइन डेटिंगसाठी याआधी टिंडर हे अ‍ॅप उपलब्ध होतं. त्याचंच अनुकरण करत आता जगातील सर्वात मोठय़ा सोशल मीडिया साइटने डेटिंग फीचर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. यूजर्सच्या फेसबुक अकाउंटहून फेसबुक डेटिंगचं अकाउंट हे वेगळं असणार आहे. फेसबुक डेटिंग यूजर्सची सगळी माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे.     डेटिंग फीचर्स वापरताना अनेकदा सिक्युरिटी इश्यूलाही सामोरं जावं लागतं. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्वेक्षणानुसार, ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप वापरणार्‍यांना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागू शकतं अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. जवळपास 59 टक्के स्मार्टफोन यूजर्स सध्या ऑनलाइन डेटिंगचा वापर करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न मोबाइल कंपन्यांना सतावत आहे. ‘नॉर्टन’च्या सर्वेक्षणानुसार  रोमॅँटिक थीम, लव्ह मीटर टेस्ट, गीटिंग व गेम्स आदी अ‍ॅप्सचा वापर जास्त करण्यात आला. भारतात डेटिंग बेस्ड सोशल नेटवर्किग साइट्सचा वापर वेगानं वाढत आहे. अनेकजण काही मर्यादित काळासाठी असे अ‍ॅप वापरून अनइन्स्टॉल करतात. सायबर क्रिमिनल्स याच गोष्टीचा फायदा घेतात आणि यूजर्सचा इंटरेस्ट पाहून ऑफर देतात.