शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातल्या तरूणांना ग्रासतोय झोपेत मेसेज करण्याचा नवा आजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 07:00 IST

पूर्वी लोक झोपेत चालत,आता लोक झोपेत मेसेज करतात.हा नवीनच आजार जगभरातल्या तारुण्याला ग्रासतो आहे आणि आपल्याला असा आजार आहे, हेच त्यांना मान्य नाही!

- निशांत महाजन 

झोपेत चालण्याचा आजार असतो, हे काही आपल्याला नवीन नाही; पण झोपेत मोबाइलवर मेसेज पाठवण्याचा आजार कुणाला होऊ शकतो का? त्या आजाराला म्हणतात ‘स्लीप टेक्सटिंग!’ म्हणजे झोपेत कुणाला तरी मेसेज पाठवणं, मेसेजला उत्तरं देणं, प्रसंगी आपण कुणाला काय मेसेज केला हे  आठवणं आणि कधीकधी तर आपण रात्री-बेरात्री मेसेज केले हेही न आठवणं या सार्‍या प्रकाराला म्हणतात स्लीप टेक्सटिंग. तरुण मुलामुलींमध्ये या नव्या आजाराचं प्रमाण मोठं असलं तरी हा आजार तरुणांपुरताच मर्यादित  नाही तर कार्पोरेट जगात काम करणा-या अनेकांना रात्री 2 किंवा 3 वाजता मेसेज पाठवण्याचा आजार झालेला दिसतो. आणि आपल्याला हा आजार आहे हेदेखील ते मान्य करत नाहीत.

मात्र जगभर सर्व जातीभेद ओलांडून हा आजार फोफावत असल्याचं झोप अभ्यासकांचं म्हणणं आहे. जर्नल  ऑफ अमेरिकन कॉलेज हेल्थ या जर्नलने अलीकडेच एक अभ्यास प्रसिद्ध केला. त्यांनी फक्त कॉलेजात जाणा-या मुलांचा अभ्यास केला तर त्यात असं दिसतंय की, 4 पैकी 1 तरुण झोपेत मेसेज पाठवतात. आणि आपण असं काही करतो हे त्यांच्या गावीही नाही.

या सा-या प्रकाराला हे अभ्यासक नाइट लाइफ बिहेव्हिअर असं म्हणतात. त्या रात्रीच्या वर्तनात हे लोक मोबाइल पाहतात, सोशल मीडिया मेसेज तपासतात आणि प्रसंगी कुणाला काही कामाचे वा बिनकामाचे मेसेजही पाठवतात. अनेकदा असे मेसेज पाठवणं धोकादायक आहे. प्रसंगी लाजिरवाणंही होतं. वाट्टेल ते लिहिणं, शिवीगाळ, मनातलं ओकणं आणि व्याकरण, अपेक्षित नसलेले शब्द वापरणं हे सारं या झोपेत मेसेज पाठवणं प्रकारात घडतं.हे का घडतं, असं शोधलं तर असं दिसतं की जवळपास 93 टक्के तरुण आपला मोबाइल उशाशीच घेऊन झोपतात. ( हा आकडा जगभरात मोबाइल वापरणा-या सर्वांसाठी खरा आहे असंही अभ्यासक सांगतात.) किमान दिवसाला 10 तास मोबाइल अनेकांच्या शब्दश: हातात असतो. विशेष म्हणजे रात्री 2 वाजता किंवा 3 वाजता, काहींना मध्यरात्रीही जाग येते आणि त्यावेळी ते सोशल मीडिया मेसेज तपासतात. प्रसंगी चर्चेत भाग घेतात. प्रसंगी पोस्ट करतात, मेसेज करतात. आणि मग पुन्हा झोपतात. जे लोक झोपेत मेसेज पाठवतात त्यापैकी 72 टक्के लोकांना हे आठवतही नाही की आपण रात्री असा काही मेसेज केला होता.

ते स्वत: तो मेसेज नाकारतात. पण यंत्र खोटं बोलत नाहीत, त्यामुळे रात्री-बेरात्री केलेल्या मेसेजचं रेकॉर्ड तयार होतंच. त्यामुळे त्यापायी जी काय शोभा होते, नाती खराब होतात, करिअरवर परिणाम व्हायचा तो होतोच.

त्याहून वाईट परिणाम आणखी एका गोष्टीवर होतो. ती म्हणजे, झोप. अनेकांना निद्राविकार होतात. त्यांचं मनस्वास्थ्य बिघडतं. मूड जातात. काहींना नैराश्यही येतं. पचन संस्थेवर जागरणाचा परिणाम होतो. आणि पुढचा दिवस उदास, रटाळ जातो.अभ्यासक सांगतात की, झोपेत हात पोहोचणार नाही, उठून जावंसं वाटणार नाही इतपत लांब तरी मोबाइल ठेवा. कारण हा नवा आजार तुम्हाला घेरेल तेव्हा त्यातून बाहेर पडणं अधिक अवघड आहे.