शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

व्हीडिओ रिझ्युम आहे का? नाही, मग नोकरीचा कॉल कसा येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 15:14 IST

नोकरीसाठी जाहिरात निघणं हेच आता बंद होईल, लिंकडीनसारख्या माध्यमातून मुलाखतीला बोलावणं, व्हिडीओ रेझ्युम पाठवा म्हणणं आणि ते व्हिडीओ पाहून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं उमेदवाराला मुलाखतीला बोलावणं हे नवीन चक्र पुढय़ात उभं आहे.

ठळक मुद्देइंडस्ट्री 4.0 चं जग आपल्या किती जवळ येऊन ठेपलंय, जागते रहो!!

-डॉ.भूषण केळकर

नोकरी मिळण्याचीच नाही तर मिळवण्याची पद्धतसुद्धा आता बदलते आहे. इंडस्ट्री 4.0 च्या काळात आता ही गोष्टही लक्षात ठेवायला हवी.हे आता उदाहरण घ्या. काही दिवसांपूर्वी मी वाचलं होतं की हिंदुस्तान युनिलिव्हरची लीना नायर नावाची एक अधिकारी असं म्हणाली होती की, या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरभरती आता नेहमीप्रमाणे नोकरीची जाहिरात वगैरे करून मग रेझ्युम मागवून होतच नाही! लिंकडीन आणि फेसबुक या समाजमाध्यमांतून लोकांना आपण होऊन विचारणा होते आणि त्यातून निवडल्या गेलेल्या लोकांना ‘व्हिडीओ रेझ्युम’ पाठवायला सांगितला जातो. हा व्हिडीओ रेझ्युम म्हणजे एक-दीड मिनिटांचा तुम्ही स्वतर्‍चा व्हिडीओ पाठवायचा ज्याच्यात तुम्ही हे सांगायचं असतं की तुमची ‘खासियत’ काय आहे, कंपनीने तुम्हाला का निवडावं? पूर्वीची छापील रेझ्युम लिहिण्याची आणि पाठवण्याची पद्धत आता कालबाह्य होत जाणार आहे. एवढंच नाही तर मुलाखतीसाठी आलेल्या अशा अनेक व्हिडीओ रेझ्युममधून अखेर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निवड होते, त्या उमेदवारांची निवड कोण करतं, तर एआय? एआयचे प्रोग्राम वापरून कुणाला मुलाखतीला बोलवायचं हे ठरतं. तुमची देहबोली, तुमचे शब्द उच्चार हे सारं तपासलं जातं एआयकडून!इंडस्ट्री 4.0 चं जग आपल्या किती जवळ येऊन ठेपलंय, हे एव्हाना लक्षात आलंच असेल तुमच्या!म्हणून म्हणतोय, जागते रहो!!मागील काही लेखांमध्ये शेतीमध्ये सुद्धा रोबोट वापरले जातील याबद्दल मी लिहिलं होते. अमेरिकेतली कालची बातमी आहे की कॅलिफोर्नियामध्ये खरोखरच अनेक ठिकाणी रोबोट वापरले जात आहेत. आपण हे लक्षात ठेवू की हे अमेरिकेत झालं तरी भारतात अजून काही वर्षे तरी हे घडणं अवघड आहे.पण एक मात्र आहे की आजकाल शहरांमध्ये बर्‍याच ठिकाणी रोबोटिक्सच्या क्लासेसचं पेव फुटलं आहे. एवढंच नव्हे तर केंद्र सरकारच्या ‘अटल टिंकरिंग लॅब्ज’ या पथदर्शी प्रकल्पामुळे नव्या पिढीला या इंडस्ट्री 4.0ची तोंडओळख अत्यंत लहान वयात होते आहे. मागील आठवडय़ात मी एका शाळेत गेलो असताना तेथील 9/10 वीच्या मुला-मुलींनी मला विचारलं की, आम्हाला डिसेंबरपासून हलक्या वजनाचे ड्रोन्स वापरता येणार आहेत, तर आता ते ड्रोन्स कसे मिळवायचे! नवीन पिढी एकूण या इंडस्ट्री 4.0 साठी विशेष सहजपणे तयार होते आहे हे स्वागतार्ह आहेच. खरं तर आपल्या केंद्र सरकारनं हे म्हटलंच आहे की ही इंडस्ट्री 4.0 चं हे आव्हान आणि संधी भारतानं स्वीकारायला हवी, कारण मागील तीन स्थित्यंतरं भारतानं पारतंत्र्यामुळे आणि फसव्या समाजवादामुळे घालवली आहेत!मागील लेखात आपण ‘हायब्रिड’ या संकल्पनेविषयी बोललो. आता हेच बघा ना बातमी आहे की एका टीव्ही शोमध्ये जिमी फॉलन या कलाकाराबरोबर आपल्या ‘सोफिया’ने गाणं गायलं. बघा झालं की नाही हायब्रिड गाणं?कालच स्टॉकहोममध्ये फरहाट नावाचा एक रोबोट ‘प्रकाशित’ झाला. जो मानवी भावभावना ‘समजू’ शकतो. एवढंच काय तर टोकियो, जपानमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये असे रोबोट आहेत की जे दिव्यांग वेर्ट्स रिमोट कंट्रोलने संचालन करतात आणि हे दिव्यांग वेर्ट्सही हॉटेलमध्ये नसतात, तर आपापल्या घरी असतात!परवाच अशी बातमी होती की संशोधकांनी पिझा बनवण्याच्या हजारो रेसिपी कॉम्प्युटरला शिकवल्या आणि एआयच्या आधारे तीन असे पिझा तयार झाले की लोकांनी त्याचा विचारही केला नसता. विशेष म्हणजे ते पिझा लोकांना प्रचंड आवडलेसुद्धा! शिंप, ज्ॉम आणि सॉसेज अशा तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन करणारा पिझा लोकांना इतका आवडला की बॉस्टनच्या रेस्टॉरंटमध्ये तो एकदम ‘हिट’ ठरला! एमआयटीमध्ये खरं तर असा एक प्रकल्प चालू आहे ज्याचं नावच मुळी ‘‘हाऊ टू जनरेट अलमोस्ट एनीथिंग’आणि हे सारं कोण करणार?तर अर्थातच एआय!