देणारच असशील काही तर एवढंच दे.

By Admin | Updated: October 27, 2016 16:04 IST2016-10-27T16:04:52+5:302016-10-27T16:04:52+5:30

मागायचंच असेल या दिवाळीत देवाकडे काही.. तर काय मागावं.. कुणाकडे मागतोय याचं तरी भान ठेवावं.. म्हणून म्हणतो देवा, देणारच असशील काही तर एवढंच दे.

Do not give anything to anyone. | देणारच असशील काही तर एवढंच दे.

देणारच असशील काही तर एवढंच दे.

 एवढंच मागतो देवा.. मागायचंच असेल या दिवाळीत देवाकडे काही.. तर काय मागावं.. कुणाकडे मागतोय याचं तरी भान ठेवावं.. म्हणून म्हणतो देवा, देणारच असशील काही तर एवढंच दे.. जिथं जिथं दिसेल द्वेषाचा जाळ तिथं तिथं माझ्या मनात प्रेमाचा शीतल झरा दे.. जमेल तसा मी तो द्वेष शांत करीन आणि माझ्यासह साऱ्यांच्या मनात मायेचा शिडकावा देईन.. ** जिथं जिथं असेल वेदना तिथं तिथं मी माझ्या बोटांना सेवेचा मलम दे.. मदतीचं बोटभर काम माझ्याकडून होऊ दे.. ** जिथं जिथं उगवला संशय, तिथं तिथं विश्वासाची बी मला पेरु दे आणि आलंच वादळ अविश्वासाचं तर आशेचं रोपटं जगू दे ** येऊ दे अंधाऱ्या रात्री मला दिवा व्हायचं बळ दे... जीव लहान असेल माझा पण प्रकाशाचं भान जगू दे.. ** एवढंच मागतो देवा, जास्त काही नको.. माझ्या साऱ्या माणसांना सुखाचा मार्ग दिसो.. सुखात त्यांच्या सोबत मला चालू दे.. कुठं आलंच दु:ख तर आडवं मला जाऊ दे.. *** एवढं जरी दिलंस ना, तरी मनापासून जगेन आनंद वाटत राहण्याचं व्रत आयुष्यभर करेन..!!

Web Title: Do not give anything to anyone.