शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसात तुम्हाला कुणी छळतंय का?

By admin | Updated: October 16, 2014 18:41 IST

ऑफिसात डोक्याला ताप नाही, कुणीच आपल्याला त्रास देत नाही, असं कधी होतं का?

- ऑक्सिजन टीम

ऑफिसात डोक्याला ताप नाही,कुणीच आपल्याला त्रास देत नाही, असं कधी होतं का?म्हणजे भले आपल्याला कुणी त्रास देवो ना देवो, आपण स्वत:ला ‘त्रास’ करून घेतोच. जेलस होतो. आपल्याही नकळत ऑफिस पॉलिटिक्सचा भाग होतो.कामाचा भाग असं म्हणून हे सारं सोडलं आणि स्पर्धेत अपरिहार्यच आहे सारं मानलं तरी प्रत्यक्षात मात्र हा विषय जरा गांभीर्यानं पहायला हवा.अलीकडेच एण्टरप्राईज इनोव्हेशन या अमेरिकेतील संस्थेनं एक सर्व्हे प्रसिद्ध केला. आयटी फिल्ड पुरताच हा सर्व्हे र्मयादित आहे. मात्र तो अभ्यास जे म्हणतोय तो धक्कादायक आहे. आयटी क्षेत्रातील ७५ टक्के लोकांनी असं कबूल केलंय की, त्यांचा ऑफिसमध्ये मानसिक छळ होतो. आणि या मनस्तापामुळे कामावरचं लक्ष उडतं. ६७ टक्के लोक सांगतात की, आपल्याला एकाच माणसानं जास्त छळलं तर ३३ टक्के लोकांनी सांगितलंय की ऑफिसमधल्या एका टोळक्यानं आपल्याला बरेचदा टार्गेट केलं.हा अभ्यास गांभीर्यानं घेत जरा आपल्या अवतीभोवती पाहिलं तर असं दिसतं की, असा त्रास नव्यानं नोकरीला लागलेल्या अनेकांना सहन करावा लागतो. पण नोकरी जाऊ नये, आपला अधिक छळ होऊ नये म्हणून अनेकजण तोंड बांधून हा बुक्क्याचा मार सहन करतात.मात्र गप्प बसल्यानं हा त्रास कमी होत नाही. तो वाढतच जातो. साप भी मर जाए और लाठी भी ना तुटे अशा अत्यंत नाजूकपणे आपण हा प्रश्न सोडवला पाहिजे.त्यासाठी न घाबरता काही गोष्टी नक्की करायला हव्यात, तरच आपलं कामात लक्ष लागेल!ऑफिसात मानसिक छळ होतोय? हे करा.1) नाही म्हणा.एखाद्या गोष्टीनं तुम्हाला वारंवार त्रास दिला जात असेल तर आपल्याला हे आवडत नाही, असं पुन्हा करू नका हे शांतपणे मात्र धीटपणे, तरीही नम्रपणे स्पष्ट सांगा. भांडू नका, पण खमके व्हा.2) शांत रहातुम्ही चिडावं, काहीतरी बोलावं, चरफडावं हेच समोरच्याला अपेक्षित असतं. तुम्ही शांत राहिलात आणि आनंदी दिसलात तर त्याचा वार बसत नाही. त्यामुळे शांत रहा, पण त्याला सांगा की, तू जे करतोय ते मला कळतं. तुम्ही चिडून काही बोललात तर त्याचं ऑफिसात भांडवल होऊन गोष्टी तुमच्या विरोधात जाण्याची शक्यताच जास्त.3) शक्य असेल तर तुमच्या बॉसला एकदा स्पष्टपणे सांगा. पण सूर तक्रारीचा नको तर आपण कानावर गोष्टी घालतोय असा ठेवा. एकदाच सांगा, चहाड्या करू नका.4) आवश्यक असेल तर एचआरवाल्यांना एक कॉन्फिडेन्शियल मेल लिहा.5) असेलच काही भांडण तर ते मिटवा, तुम्ही वाढवू नका. सहनच नाही झालं तर एकदा चारजणांना एकत्र घेऊन सोक्षमोक्ष लावा. भांडण विसरून जा, पण ती वृत्ती मात्र लक्षात ठेवून सावध रहा.