शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वे

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

पावसाच्या व्यत्ययामुळे झिम्बाब्वे-न्यूझीलंड सराव सामना रद्द

पावसाच्या व्यत्ययामुळे झिम्बाब्वे-न्यूझीलंड सराव सामना रद्द
लिंकन : मार्टिन गुप्तिलने आक्रमक शतकी खेळी केली खरी; पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सोमवारी पावसामुळे विश्वकप स्पर्धेचा सराव सामना रद्द होण्यापूर्वी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणार्‍या न्यूझीलंडतर्फे गुप्तिलने शतकी खेळी केली. गुप्तिलचा अपवाद वगळता न्यूझीलंडचे अन्य फलंदाज धावा फटकाविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला, त्या वेळी न्यूझीलंड संघाची ३०.१ षटकांत ७ बाद १५७ अशी अवस्था होती. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली; पण त्यांच्या फलंदाजांना मात्र स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. अखेर संततधार पावसामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
गुप्तिलने ८६ चेंडूंना सामोरे जाताना १०० धावा फटकाविल्या. त्यात १३ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. गुप्तिलव्यतिरिक्त रॉस टेलर (११) दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरला. झिम्बाब्वेतर्फे वेगवान गोलंदाज एल्टन चिंगुम्बुरा (२-२१) आणि टिनसे पनयांगरा (२-२८) यांनी ढगाळ वातावरणाचा चांगला लाभ घेतला. न्यूझीलंडचा अखेरचा सराव सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे तर झिम्बाब्वेची लढत श्रीलंकेविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)