इलेव्हन ७७ संघाची आगेकूच कायम

By Admin | Updated: April 7, 2015 23:24 IST2015-04-07T23:24:31+5:302015-04-07T23:24:31+5:30

सलामीवीर मयुरेश नरवणकर याने केलेल्या शानदार ६८ धावांच्या जोरावर इलेव्हन ७७ संघाने कांगा लीग क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटातील विजयी

The XI 77 came ahead of the team | इलेव्हन ७७ संघाची आगेकूच कायम

इलेव्हन ७७ संघाची आगेकूच कायम

मुंबई : सलामीवीर मयुरेश नरवणकर याने केलेल्या शानदार ६८ धावांच्या जोरावर इलेव्हन ७७ संघाने कांगा लीग क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटातील विजयी घोडदौड कायम राखताना गोमंतक दैवज्ञ सीसी संघाला ६ विकेट्स राखून पराभूत केले. गोमंतक संघाने दिलेले २०२ धावांचे लक्ष गाठताना इलेव्हन संघाने ३६.४ षटकांत विजय मिळवला.
शिवाजी पार्क येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून इलेव्हन संघाने गोमंतक संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. यावेळी इलेव्हन संघाने अचूक मारा करताना गोमंतकला निर्धारीत ४५ षटकांत ९ बाद २०१ धावांवर रोखले. मलय शाहने ७४ धावांची महत्त्वपुर्ण खेळी करताना संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना इलेव्हन संघाने आक्रमक सुरुवात केली. सौरभ ठाकूर (१४) झटपट बाद झाल्यानंतर मयुरेशने केदार गोखले (२८) सोबत ६३ धावांची भागीदारी करीत संघाला सावरले. केदार बाद झाल्यानंतर आलेल्या प्रकाश गोहिलला देखील माघरी धाडत गोमंतकने सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र यावेळी मयुरेशने सर्व सुत्रे आपल्या हाती घेताना पंकज बंदाबे सोबत निर्णायक ९९ धावांची भागीदारी करीत इलेव्हनचा विजय निश्चित केला. संघाला विजायासाठी ६ धावांची गरज असताना मयुरेशआक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्ना बाद झाला आणि त्यानंतर संदेश धुळेकर व पंकज यांनी संघाच्या विजयावर शिक्का मारला. मयुरेशने ८८ चेडूत ६ चौकारांसह ६८ धावा फटकावल्या. तर पंकजने ६४ चेंडूमध्ये संयमी नाबाद ३५ धावा काढताना ४ चौकार मारले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The XI 77 came ahead of the team