शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महिला संघाचे ‘मिशन सेमीफायनल’

By admin | Updated: July 8, 2017 01:24 IST

आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषकात आज शनिवारी द. आफ्रिकेला लोळवून उपांत्य फेरी

लीसेस्टर : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषकात आज शनिवारी द. आफ्रिकेला लोळवून उपांत्य फेरी गाठण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंकेला सहज पराभूत करीत गुणतालिकेत आॅस्ट्रेलियापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. द. आफ्रिकेने चारपैकी दोन सामने जिंकले तर एक सामना त्यांना गमवावा लागला. हा संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यांचा एक सामना रद्द झाला.भारतीय संघ जबर फॉर्ममध्ये आहेच शिवाय अलीकडे द. आफ्रिकेविरुद्ध विश्वचषक पात्रता फेरी आणि चौरंगी मालिकेत मिळालेल्या यशानंतर खेळाडूंना चांगलाच हुरुप आला.भारताने मागच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध २३२ धावांचा यशस्वी बचाव केला होता. या सामन्यात दीप्ती शर्माने ७८ तर मितालीने ५३ धावा केल्या. त्याआधी स्मृती मानधनाने ६८ धावा केल्या होत्या. स्मृतीने आतापर्यंत २०६ आणि मितालीने १७८ धावा ठोकल्या आहेत. गोलंदाजीत एकता बिश्त, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा या फिरकी त्रिकूटाने आतापर्यंत १९ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)दुसरीकडे मागच्या सामन्यात द. आफ्रिका संघ इंग्लंडकडून ६८ धावांनी पराभूत झाला. भारताविरुद्ध मुसंडी मारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. इंग्लंडने त्या सामन्यात विश्वचषकाच्या इतिहासातील चौथी सर्वांत मोठी धावसंख्या नोंदविली होती.उभय संघ असेभारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि नुजहत परविन.दक्षिण आफ्रिका : डेन वॉन नीकर्क (कर्णधार), तृषा चेट्टी, मोसेलिन डॅनियल्स, नेदिन डी क्लार्क, मिगनोन डु प्रीज, शबनम इस्माईल, मारिजेन केप, अयाबोंगा खाका, मासाबाता क्लास, लिजेल ली, सुन लूस, रेसिबे तोजाखी, अ‍ॅन्ड्री स्टेन, क्लो ट्रायन, लारा वोलवार्ट आणि ओडिन कर्स्टन.