नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्तीचे कांस्य जिंकणारी महिला मल्ल साक्षी मलिक युनायटेड विश्व कुस्तीच्या नव्या क्रमवारीत ५८ किलो वजन गटात करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट चौथ्या स्थानावर दाखल झाली आहे.आॅलिम्पिक पदकविजेती पहिली भारतीय मल्ल साक्षीला याआधी कुठलीही रँकिंग नव्हते. पुरुष फ्रीस्टाईलमध्ये संदीप तोमर आणि बजरंग पुनिया हे मल्लदेखील आघाडीच्या २० जणांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले. आॅलिम्पिकच्या पहिल्या लढतीत पराभूत झालेला संदीप ५७ किलो वजन गटात १५ व्या आणि बजरंग ६१ किलो गटात १८ व्या स्थानावर आहे.(वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}