शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

विंडीज क्रिकेट बोर्ड निष्क्रिय, अविश्वसनीय!

By admin | Updated: December 17, 2015 01:24 IST

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड निष्क्रिय तसेच अविश्वसनीय झाले असून, पदाधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे. खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने विंडीज क्रिकेट रसातळाला जात

किंग्स्टन : वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड निष्क्रिय तसेच अविश्वसनीय झाले असून, पदाधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे. खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने विंडीज क्रिकेट रसातळाला जात असल्याची टीका माजी महान वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग तसेच माजी कर्णधार ड्वेन ब्राव्हो यांनी केली आहे.विंडीज बोर्डाच्या कार्यशैलीवर नेम साधताना होल्डिंग म्हणाले, ‘‘पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रिय आणि अविश्वसनीय वृत्तीमुळे क्रिकेटचे नुकसान झाले. पुढील नुकसान टाळण्यासाठी बोर्डात आमूलाग्र बदल व्हायला हवेत. बोर्डातील सध्याचे पदाधिकारी, त्यांची कार्यशैली आणि खेळाडूंसोबतची वागणूक आडमुठेपणाची राहील तोपर्यंत स्थिती आणखी खालावत जाईल, यात शंका नाही. बोर्डाचे संचालनकर्ते चांगले नसतील, तर उत्तम प्रशासन आणि पारदर्शी कारभाराची आशा बाळगता येणार नाही.’’विंडीज संघ होबार्ट कसोटीत आॅस्ट्रेलियाकडून १ डाव २१२ धावांनी पराभूत झाला. त्यानंतर शनिवारी सेंट ल्युसिया येथे विंडीज बोर्डाची त्रैमासिक बठक झाली; पण बोर्डाने पराभवावर कुठलीही चिंता दर्शविली नव्हती. कॅरेबियन समुदायानेदेखील क्रिकेट बोर्डाला ‘जुनाट’, ‘अविकसित’, ‘तानाशाही कारभार करणारा’ असे संबोधून बोर्ड बरखास्त करण्याची मागणी केली.माजी कर्णधार ब्राव्हो म्हणाला, ‘‘पदाधिकाऱ्यांचे खेळाडूंसोबतचे संबंध मधुर नाहीत. याशिवाय, पायाभूत सुविधादेखील पुरविल्या जात नाहीत. आमच्या देशात क्रिकेटवर राजकारणाचा पगडा आहे. आमच्याकडे अनेक शानदार खेळाडू आहेत; पण राजकारणाने खेळाची ‘वाट’ लावली. ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते खेळाच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात. खेळाडूंसाठी उत्कृष्ट मैदान, नेट आणि अकादमी असे काहीच नाही. कामगिरी ढासळण्याला या गोष्टी जबाबदार ठरतात. खेळाडू, पदाधिकारी आणि व्यवस्थापन यांच्यात परस्पर विश्वास आणि समन्वय तसेच प्रामाणिकवृत्ती असेल तरच प्रगती शक्य होईल.’’विंडीज बोर्ड आणि खेळाडूंमध्ये फुटीची ठिणगी पडण्यामागे विंडीज संघाची भारत दौऱ्यातून अर्ध्यातून माघार, हे कारण दिले जाते. त्या वेळी ब्राव्हो कर्णधार होता. विंडीज संघ भारतातून मायदेशात दाखल होताच ब्राव्होकडून नेतृत्व काढून घेण्यात आले. नंतर विश्वचषकासाठी त्याला संघातही स्थान देण्यात आले नव्हते. ब्राव्होने जानेवारीत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.(वृत्तसंस्था)