शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

By admin | Updated: September 7, 2015 00:13 IST

आॅस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू शेन वॉटसनने रविवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली. या ३४ वर्षीय क्रिकेटपटूने कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना

लंडन : आॅस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू शेन वॉटसनने रविवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली. या ३४ वर्षीय क्रिकेटपटूने कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध कार्डिफमध्ये खेळला. त्या लढतीत आॅस्ट्रेलिया संघाला १६९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. वॉटसनने त्या लढतीत ३० व १९ धावा केल्या होत्या आणि बळी घेण्यात त्याला यश मिळाले नव्हते. त्यामुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी त्याची अंतिम संघात निवड झाली नव्हती. क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या अधिकृत वेबसाईटवर वॉटसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. वॉटसन म्हणाला, ‘मी पूर्ण विचार केल्यानंतरच हा निर्णय घेतला आहे. निवृत्ती स्वीकारण्याची ही योग्य वेळ आहे. मला अद्याप वन-डे व टी-२० मध्ये खेळण्याची आशा आहे. माझ्यासह माझे कुटुंबीय व संघासाठी चांगले काय, अशा प्रश्नांचे माझ्या डोक्यात काहूर माजले होते. गेल्या दोन दिवसांमध्ये मला या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले. मी कसोटी क्रिकेट खेळताना सर्वोत्तम प्रयत्न केला, असे माझे वैयक्तिक मत आहे.’ वॉटसनने एक कसोटी व ९ वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित वन-डे सामन्यांत तो खेळू शकणार नाही.