शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वेतन वादामुळे वॉल्शचा राजीनामा

By admin | Updated: October 22, 2014 04:51 IST

भारतीय हॉकी संघाला तब्बल १६ वर्षांनंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा-या टेरी वॉल्श यांनी वेतनाच्या वादामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे़

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाला तब्बल १६ वर्षांनंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा-या टेरी वॉल्श यांनी वेतनाच्या वादामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे़ विशेष म्हणजे वॉल्श यांनी भारतामध्ये खेळात असलेल्या नोकरशाहीला जबाबदार ठरविले आहे़भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) संचालक जी़ जी़ थॉमसन यांना लिहिलेल्या पत्रात वॉल्श यांनी म्हटले, की भारतामध्ये खेळात असलेल्या नोकरशाहीमुळे मी पदाचा राजीनामा देत आहे़ खेळात असलेली नोकरशाही भविष्यात भारतीय हॉकी आणि खेळाडूंसाठी घातक ठरू शकते, तसेच संघाला सतत विविध देशांत यात्रा करावी लागत असल्यामुळेही पदाचा त्याग करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे़ आॅस्ट्रेलियात असलेल्या कुटुंबीयांना आता मी जास्तीत जास्त वेळ देऊ इच्छितो़ व्यावसायिक जीवनामुळे माझ्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होत होता़ त्यामुळेही हा निर्णय घेत आहे़ राष्ट्रीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात संधी दिली, त्याबद्दलही वॉल्श यांनी आभार मानले़ हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा म्हणाले, की वेतन वादासह अन्य अनेक मुद्यांवर वॉल्श यांना समस्या होती़ वॉल्श यांचा १९ नोव्हेंबर रोजी करार संपणार आहे़ त्याआधी साई पुन्हा त्यांच्या करारावर चर्चा करू शकते़ जेणेकरून २०१६च्या आॅलिम्पिकपर्यंत ते टीमसोबत कायम राहू शकतील़ साई व वॉल्श यांच्यात बैठक आयोजित करण्याचा सल्लाही बत्रा यांनी दिला आहे़ (वृत्तसंस्था)