बीसीसीआयच्या निर्णयाची सोमवारपर्यंत प्रतीक्षा

By Admin | Updated: December 6, 2015 01:50 IST2015-12-06T01:50:00+5:302015-12-06T01:50:00+5:30

भारताविरुद्ध या महिन्याअखेरीस श्रीलंकेत मालिका खेळण्यासाठी भारताच्या होकाराची सोमवारपर्यंत प्रतीक्षा करणार असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली.

Wait till BCCI's decision Monday | बीसीसीआयच्या निर्णयाची सोमवारपर्यंत प्रतीक्षा

बीसीसीआयच्या निर्णयाची सोमवारपर्यंत प्रतीक्षा

कराची : भारताविरुद्ध या महिन्याअखेरीस श्रीलंकेत मालिका खेळण्यासाठी भारताच्या होकाराची सोमवारपर्यंत प्रतीक्षा करणार असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली.
सोमवारपर्यंत बीसीसीआयने सरकारकडून मालिकेची मंजुरी न मिळविल्यास या मालिकेची आशा संपुष्टात आल्याची आमची खात्री पटेल, असे पीसीबीचे मत आहे. मालिकेच्या आयोजनास फारच कमी वेळ असल्याने सोमवारपर्यंत होकार न मिळाल्यास आयोजन धोक्यात येईल. भारत सरकार मालिकेला मंजुरी प्रदान करेल, अशी पीसीबीला देखील आशा नाही. लंकेत डिसेंबरच्या मधल्या टप्प्यात मालिका आयोजनास अधिक वेळ शिल्लक नाही. तिसऱ्या देशात मालिका आयोजन करायचे झाल्यास फार वेळ लागतो. डिसेंबरमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या जल्लोषानिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने लंकेत गर्दी करतात. वेळ कमी असल्याने टायटल प्रायोजक तसेच अन्य प्रायोजक शोधणे पीसीबीसाठी फार कठीण होत आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Wait till BCCI's decision Monday