शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
3
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
4
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
5
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
6
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
7
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
8
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
9
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
10
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
11
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
12
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
13
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
14
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
15
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
16
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
17
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
18
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
19
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
20
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र सेहवागच्या निवृत्तीचे संकेत...

By admin | Updated: October 20, 2015 00:57 IST

क्रिकेट जगतातील कोणत्याही गोलंदाजाच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता राखून असलेल्या भारताचा तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत

दुबई : क्रिकेट जगतातील कोणत्याही गोलंदाजाच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता राखून असलेल्या भारताचा तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. भारतात जाऊन अधिकृतरीत्या घोषणा करणार असल्याचे खुद्द सेहवागनेच दुबई येथे झालेल्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या लाँचिंग दरम्यान स्पष्ट केले. सोमवारी रात्री सेहवागच्या निवृत्ती बाबत वावड्या उठल्यानंतर स्वत: सेहवागने या वृत्ताचे खंडन केले. मंगळवारी ‘वीरु’चा ३७ वाढदिवस आहे. पुढीलवर्षी होणाऱ्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये सहभागी होण्याचा त्याने इरादा स्पष्ट केला. वेगवान गोलंदाज झहीर खानच्या निवृत्तीनंतर सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.दुबई येथे मास्टर्स लीग स्पर्धेशी जुळण्याआधी सेहवागने निवृत्ती बाबत संकेत दिले. निवृत्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी असलेल्या या स्पर्धेत खेळण्याची इच्छा असलेल्या सेहवागच्या भारतीय संघातील पुनरागमनाची शक्यता धूसरच आहे. मास्टर्स चॅम्पियन लीगच्या लाँचिंग प्रसंगी सेहवाग वेस्ट इंडियच्या ब्रायन लारा, दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ आणि इंग्लंडच्या अजहर मेहमूद या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह उपस्थित होता. यावेळी सेहवागला या स्पर्धेत खेळण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सेहवागने स्पष्ट केले की, ही स्पर्धा निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंसाठी असून या स्पर्धेत खेळण्यासाठी मला आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त व्हावे लागेल. भारतात परतल्यानंतर अधिकृतरीत्या मी माझ्या निवृत्तीबाबत घोषणा करेल. यानंतर क्रिकेटविश्वआत मोठी खळबळ माजली. (वृत्तसंस्था)मी भारतात परतल्यानंतर निवृत्तीची अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगून सेहवाग म्हणाला,‘ निवृत्त झाल्यास दुबईतील मास्टर्स टी-२० लीग नक्की खेळेन. ’ ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारीत रंगणार आहे. सध्या सेहवाग हरिणाकडून रणजी सामने खेळत आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या सेहवागने अखेरचा कसोटी सामना मार्च २०१३ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबादेत खेळला होता.