शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या या फिरकीपटूमुळे विराटसेनेनं गमावली पुणे कसोटी

By admin | Updated: February 26, 2017 17:24 IST

ऑस्ट्रेलियनं संघाने भारताला पराभूत करण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून तयारी केली आहे. यासाठी त्यांनी भारताच्या माजी फिरकीपटूला फिरकी सल्लागारपदी नियुक्त केले होते.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - पुण्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 333 धावांनी मानहानीजनक पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही डावांत मिळून सामन्यात 70 धावांमध्ये 12 बळी घेणारा फिरकीपटू ओकिफी ऑस्ट्रेलियाच्या विजयाच सुत्रधार ठरला. ऑस्ट्रेलियनं संघाने भारताला पराभूत करण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून तयारी केली आहे. यासाठी त्यांनी भारताच्या माजी फिरकीपटूला फिरकी सल्लागारपदी नियुक्त केले होते. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्यास सक्षम बनविण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी भारतीय फिरकीपटू श्रीराम श्रीधरनची फिरकी सल्लागारपदी नियुक्ती केली. तर इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पनेसरची फिरकी गोलंदाज सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाला माहित होतं की भारत दौऱ्यात त्यांना फिरकीसाठी चांगल्या स्पिचचा सामना करावा लागणार आहे. यामुळे पुण्याच्या क्यूरेटरने पिचमध्ये बाउंस असल्याचं म्हटल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने स्पिनर्सला खेळवलं. कंगारुंनी यावेळेस फिरकीसोबत चांगली तयारी केली आहे. 40 वर्षीय श्रीराम यांनी 29 जानेवारीला स्पिन कंसल्टंट म्हणून दुबईला गेले. जेथे ऑस्ट्रेलिया टीमचे काही सदस्य होते जे प्रॅक्टीस करत होते. त्यांनी भारत दौऱ्यात येण्याआधीच अश्विन आणि जडेजा यांच्या बॉलिंगचा सामना कसा करायचा याबाबतच्या टीप्स ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिल्या. त्याबरोबरच भारतीय फलंदाजांची कुमकुवत बाजू काय आहेत. भारतीय खेळपट्यावर कशी गोलंदाजी करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. याचा फायदा ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत घेतला आणि 19 सामन्यांत अपराजित राहण्याचा भारताचा अश्वमेध ऑस्ट्रेलियाने रोखला. श्रीधरनने भारतातर्फे मार्च 2000 ते डिसेंबर 2004 या कालावधीत ८ वन-डे सामने खेळले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया संघाची श्रीलंका दौऱ्यात आणि भारतात खेळल्या गेलेल्या विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान मदत केली होती. सिडनीमध्ये क्लब क्रिकेटपटू म्हणून खेळत असलेल्या ३४ वर्षीय पानेसरने 2012-13 मध्ये इंग्लंडला भारतात संस्मरणीय विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची निवड केली आहे. पनेसरने त्यावेळी तीन कसोटी सामन्यांत 17 बळी घेतले होते.