शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

विनेश फोगाट रौप्य पदकाची मानकरी आहे की नाही? निकालाची वेळ ठरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 16:12 IST

विनेश फोगाटसह भारताच्या बाजूनं निकाल लागणार का? ते पाहण्याजोगे असेल.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने पॅरिस ऑलिम्पिकमधील अपात्रतेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील निकाल स्पर्धेची सांगता पूर्वी येईल हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. आता यासंदर्भात  मोठी अपडेट समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून (Court of Arbitration for Sports) विनेश फोगाटसह भारताच्या बाजूनं निकाल लागणार का? ते पाहण्याजोगे असेल. हा निकाल सकारात्मक असेल, असा विश्वास भारतीय ऑलिम्पिक समितीनंही व्यक्त केला आहे. विनेश फोगाट हिने संबंधित याचिकेच्या माध्यमातून संयुक्त रौप्य पदक मिळावे, अशी विनंती केली आहे. जर निकाल तिच्या बाजूनं लागला तर भारताच्या खात्यात आणखी एका रौप्य पदकाची भर पडेल. 

निकालाची वेळ ठरली!

विनेश फोगटच्या ऑलिम्पिक अपात्रतेविरुद्धच्या या खटल्यात ज्येष्ठ  वकील हरिश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर फोगटची आणि भारतीय ऑलिम्पिक समितीची बाजू मांडली. या प्रकरणातील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या समारोह कार्यक्रमाआधी शनिवारी पॅरिसमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता ( भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30) या खटल्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

सुवर्णमयी इतिहासाचा क्षण अनुभवायला मिळेल, असे वाटत असताना बसला होता दणका

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत 50 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती. असा पराक्रम करणारी ती भारताची महिली महिला कुस्तीपटूही ठरली. एका बाजूला ती सुवर्णमय इतिहास रचणार अशी चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला तिच्यासह भारताला मोठा धक्का बसला. अंतिम  लढतीआधी नियमापेक्षा अधिक वजन असल्याच्या कारणावरून तिला अपात्र ठरवण्यात आले होते. 

विनेश फोगाटची निवृत्ती अन् आखाड्याबाहेरचा न्यायासाठी खेळलेला डाव

याप्रकरणानंतर "कुस्ती जिंकली, पण मी हारले" असे म्हणत आखाडा कायमचा सोडण्याचा निर्णयही विनेश फोगाटने घेतला. पण जगातील मानाच्या स्पर्धेतील सन्मान मिळवण्यासाठी तिने  आंतरराष्ट्रीय  क्रीडा लवादाकडे  (Court of Arbitration for Sport) दाद मागितली होती. जो कोणत्याही खेळाडूसाठी एक शेवटचा पर्याय आहे.   

तिला न्याय मिळणार का?

विनेश फोगाटनं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केलेल्या याचिकेनुसार, अपात्र घोषित झाल्यानंतर  50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील रौप्य पदक संयुक्तरित्या मिळावे, अशी विनंती करण्यात आली आहे तिच्या याचिकेवर सकारात्मक विचार करत CAS नं यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.  खेळाडूंची बाजू समजून घेतल्यानंतर लवादाकडून काय निकाल देण्यात येणार ते पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४