शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

वेंगसरकर यांना जीवनगौरव

By admin | Updated: May 31, 2016 03:44 IST

क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकिर्दीचा मी पूर्ण आनंद घेतला. प्रत्येक सामना, प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक दौरा मी देशासाठी खेळलो. आजपर्यंतच्या माझ्या १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीवर मी आनंदी आहे,

मुंबई : क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकिर्दीचा मी पूर्ण आनंद घेतला. प्रत्येक सामना, प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक दौरा मी देशासाठी खेळलो. आजपर्यंतच्या माझ्या १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीवर मी आनंदी आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. त्याच वेळी विराट कोहलीला सर्वोत्तम टी-२० खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.सोमवारी मुंबईत झालेल्या सीएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार २०१५-१६ सोहळ्यात वेंगसरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गोरविण्यात आले. या वेळी वेंगसरकर यांनी मत व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेनन यांच्या उपस्थितीत वेंगसरकर, वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप आणि आॅस्टे्रलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यांनी सीएट ड्रीम टीमचीही निवड केली. या संघाच्या कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनीची निवड झाली.‘‘क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मी युवा खेळाडूंना दर्जेदार क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अकादमी स्थापन केली. मध्यमवर्गातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली चमक दाखवतात. मात्र, सर्वांनाच सोयीसुविधांअभावी हे शक्य होत नाही. त्यामुळेच अशा खेळाडूंना अधिक मार्गदर्शन देण्याचा मी निर्णय घेतला,’’ असेही वेंगसरकर यांनी सांगितले. युवा खेळाडूंना संदेश देताना वेंगसरकर म्हणाले, ‘‘शेवटपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. मेहनत आणि चिकाटी असणे महत्त्वाचे आहे. रणजी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही श्रेयश अय्यरसारख्या युवा खेळाडूची भारतीय संघात वर्णी लागली नाही. यामुळे साहजिकच तो दु:खी झाला. परंतु, त्याच्याशी बातचीत करून त्याला शेवटपर्यंत आपले प्रयत्न सोडायचे नाही, असा सल्ला दिला. त्यामुळे युवा खेळाडूंनी कधीही मेहनतीत तडजोड करून नये.’’या वेळी इंग्लंडच्या जो रुटला वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. तर, रोहित शर्मा व आर. आश्विन यांना अनुक्रमे सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)