शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियन मीडियाने केले विराटला ‘टार्गेट’

By admin | Updated: March 23, 2017 00:31 IST

भारताचा कर्णधार विराट कोहली याला आॅस्ट्रेलियन मीडियाने जबर टार्गेट केले आहे. आमचे दोन-तीन पत्रकार तर विराटची प्रतिमा धुळीस मिळविण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतात

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली याला आॅस्ट्रेलियन मीडियाने जबर टार्गेट केले आहे. आमचे दोन-तीन पत्रकार तर विराटची प्रतिमा धुळीस मिळविण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतात, असे मत माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने व्यक्त करीत अप्रत्यक्षरीत्या विराटला पाठिंबा दिला.आॅस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’मधील वृत्तात कोहलीची तुलना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करण्यात आली होती. आॅस्ट्रेलियाचे फिजिओ पॅट्रिक फॉरहर्ट यांच्यावर दडपण आणल्याचा कोहलीवर आरोप लावण्यात आला. याप्रकरणी ट्रम्प यांच्यासारखाच स्वत:चा कमकुवतपणा लपविण्यासाठी कोहली मीडियाला दोषी ठरवितो, असे वृत्तात म्हटले आहे. क्लार्कने मात्र भारतीय कर्णधाराची बाजू घेतली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना क्लार्क म्हणाला, ‘‘विराटची ट्रम्पशी तुलना करणे मूर्खपणा आहे. विराटने जे केले, ते स्मिथनेदेखील केले असावे. याद राखा, मी आणि आॅस्ट्रेलियन चाहते विराटला पसंत करतात. तो ज्या प्रकारे खेळतो त्यात आॅस्ट्रेलियन खेळाडूची झलक दिसते. आव्हान स्वीकारण्याची त्याची वृत्ती अप्रतिम आहे. आमचे दोन-तीन पत्रकार त्याच्या मागे हात धुऊन लागलेले दिसतात. विराटला मात्र त्रस्त होण्याची गरज नाही.’’क्लार्क म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियन मीडियात जे प्रकाशित होत आहे ते वाचून स्मिथदेखील विचलित होत असावा. अशा स्थितीत दोन्ही कर्णधारांनी धरमशाला येथे विजय कसा मिळेल, याबद्दल चिंतन करण्याची गरज आहे. सध्याच्या मालिकेत २०१५ च्या अ‍ॅशेस मालिकेसारखी परिस्थिती उद्भवली आहे. त्या वेळी प्रत्येक सामना जीवनमरणाचा प्रश्न बनल्यामुळे विजयासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावले होते. मैदानाबाहेर मात्र उभय संघांत मैत्रीभाव कायम होता. या मालिकेचा निर्णय अखेरच्या सामन्यात होईल, हे चांगले लक्षण आहे.’’कोहली कुठल्याही क्षणी मोठी खेळी करू शकतो. विराट भक्कम खेळाडू आहे. अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूला भक्कम राहायलाच हवे. चॅम्पियन खेळाडूचे लक्षणदेखील हेच आहे. धरमशाला येथे मोठ्या धावा काढून तो विजय मिळवून देईल, यात शंका नाही. फलंदाजीला आला, की चाहत्यांची त्याच्याकडून शतकाची अपेक्षा असते, असे क्लार्कने नमूद केले.(वृत्तसंस्था)