शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियन चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्टची एंट्री

By admin | Updated: November 5, 2016 05:36 IST

वायुवेगाने धावणारा जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट हा पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात आयोजित सांघिक चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा सहभागी होणार आहे.

मेलबोर्न : वायुवेगाने धावणारा जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट हा पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात आयोजित सांघिक चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा सहभागी होणार आहे. ३० वर्षांच्या बोल्टने शुक्रवारी ही माहिती दिली. त्याने रिओ आॅलिम्पिक आटोपताच निवृत्ती जाहीर केली होती.नऊ वेळेचा आॅलिम्पिक चॅम्पियन बोल्ट मेलबोर्न येथे फेब्रुवारीत निट्रो अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ‘बोल्ट आॅफ आॅल स्टार्स’चे नेतृत्व करेल. जमैकाचा हा स्टार खेळाडू म्हणाला, ‘ट्रॅक अँड फिल्ड’च्या या अनोख्या स्पर्धेशी जुळून आनंद झाला. मी केवळ स्पर्धक नाही, तर येथे कर्णधारदेखील असेन.’रिओ आॅलिम्पिकच्या १००, २०० तसेच चार बाय १०० मीटरचे सुवर्ण जिंकून सुवर्ण हॅट्ट्रिक साजरी करणाऱ्या बोल्टने आॅस्ट्रेलियन चॅम्पियनशिपशी जुळण्यासाठी ७ लाख ६० हजार पौंड डॉलरचा करार केला. या स्पर्धेचे पहिले सत्र लेकसाईड स्टेडियममध्ये ४, ९ आणि ११ फेब्रुवारीला आयोजित करणार आहे. यात सहा संघ सहभागी होतील. सर्व संघांत २४ पुरुष आणि महिला धावपटू आहेत. या स्पर्धेत बिगर पारंपरिक पद्धतीने मध्यम पल्ल्याची दौड तसेच अडथळा दौडही होईल. बोल्ट म्हणाला, ‘निट्रो अ‍ॅथलेटिक्ससारख्या स्पर्धेची ट्रॅक अँड फिल्ड प्रकाराला गरज आहे.’ हे खेळाचे नवे स्वरूप आहे. बोल्टने रिओ आॅलिम्पिकनंतर आॅलिम्पिकमधून निवृत्ती जाहीर केली होती. तथापि, २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपर्यंत करिअर सुरू ठेवणाऱ्या वृत्ताचा इन्कारदेखील केलेला नाही.(वृत्तसंस्था)