शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

उमेशने चांगली सुरुवात केली : गंभीर

By admin | Updated: May 6, 2015 02:54 IST

गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध ३५ धावांनी विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली.

कोलकाता : गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध ३५ धावांनी विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली. पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा वेगवान गोलंदाज उमेश यादवची गंभीरने विशेष प्रशंसा केली. गंभीर म्हणाला, ‘‘सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय साकारता आला. या खेळपट्टीवर १६०-१६५ धावा पुरेशा होत्या; पण त्यानंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून सामन्याचे पारडे आमच्या बाजूने झुकवले. गोलंदाजांनी अचूक मारा केला. आंद्रे रसेल जर लवकर बाद झाला नसता, तर आम्हाला १८०पर्यंत मजल मारता आली असती. फिरकीपटूंची कामगिरीही उल्लेखनीय ठरली.’’गंभीरने वेगवान गोलंदाज उमेश यादवची प्रशंसा करताना म्हटले, ‘‘उमेशने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने सनरायझर्स संघाच्या पहिल्या दोन विकेट सुरुवातीच्या षटकात माघारी परतवल्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली आला. त्यानंतर अन्य गोलंदाजांनी अचूक मारा करून दडपण कायम राखले.’’ गंभीर पुढे म्हणाला, ‘‘आम्ही सुरुवातीला फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. तीन फिरकीपटूंचा समावेश असलेला आमचा संघ लक्ष्याचा बचाव करण्यात यशस्वी ठरेल, असा आम्हाला विश्वास होता.’’पहिल्याच षटकात दोन बळी घेऊन ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरलेला उमेश यादव म्हणाला, ‘‘डेव्हिड वॉर्नरचा बळी आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. प्रतिस्पर्धी संघावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजविणे आवश्यक होते. वॉर्नरला रोखण्यासाठी आम्ही विशेष योजना आखली होती व त्यात यशस्वी ठरलो.’’उमेश पुढे म्हणाला, ‘‘मी सध्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले असून, गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. वेगवान गोलंदाज असल्यामुळे योजनाबद्ध मारा करणे आवश्यक असते आणि चेंडूची दिशा स्वत:च निश्चित करावी लागते.’’ उमेशने ४ षटकांत ३४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)