शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची निविदा प्रक्रिया पूर्ण

By admin | Updated: December 1, 2015 03:19 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढील दोन सत्रांसाठी दोन नव्या संघांचा शोध घेण्याची निविदा प्रक्रिया सोमवारी बंद केली. हे दोन संघ चेन्नई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढील दोन सत्रांसाठी दोन नव्या संघांचा शोध घेण्याची निविदा प्रक्रिया सोमवारी बंद केली. हे दोन संघ चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे स्थान घेणार आहेत. या दोन संघांना निलंबित करण्यात आले आहे. आयपीएल २०१३ मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीच्या अंतरिम अहवालानंतर बीसीसीआयच्या कार्य समितीने चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्या स्थानी दोन नवे संघ खेळविण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीअयने १६ नोव्हेंबर रोजी निविदा नोटीस प्रकाशित केली. त्यात २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी आयपीएलमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या फ्रॅन्चायझींच्या संचालन व व्यवस्थापन अधिकाराबाबत माहिती मागवली होती. निविदाअंतर्गत स्थानिक लीग सामने बीसीसीआयतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येतील आणि अन्य अधिकारही मिळतील. आयपीएल संचालन परिषदेचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी निवदा नोटीस प्रकाशित होण्यापूर्वी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, आयपीएल संचालन परिषदेने फ्रॅन्चायझी स्थळांच्या यादीमध्ये जयपूर व कोचीला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्ला म्हणाले, ‘दोन नव्या संघांसाठी एकूण नऊ स्थळांची निवड करण्यात आली आहे. ८ डिसेंबर रोजी बोली प्रक्रिया होईल. रिव्हर्स बोलीसाठी मूळ किंमत ४० कोटी रुपये राहील.’