शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगा सोबत नसणार याचे दु:ख

By admin | Updated: May 31, 2016 03:49 IST

आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत देशाच्या ध्वजाखाली खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. परंतु, या वेळी अशी संधी भारतीय बॉक्सर्सला मिळणार नसल्याचे जास्त दु:ख आहे.

मुंबई : आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत देशाच्या ध्वजाखाली खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. परंतु, या वेळी अशी संधी भारतीय बॉक्सर्सला मिळणार नसल्याचे जास्त दु:ख आहे. मात्र, तरीही आम्ही सकारात्मक खेळ करून पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी खंत आगामी रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या एकमेव भारतीय बॉक्सर शिव थापा याने व्यक्त केली.सोमवारी, मुंबईत झालेल्या आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्ट (ओजीक्यू) कार्यक्रमदरम्यान थापा याने आपले मत मांडले. आॅलिम्पिकच्या पूर्वतयारीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात या वेळी थापासह, हिना सिद्धू, पी. व्ही. सिंधू, जीतू राय, चैन सिंग, आयोनिक पॉल, पूर्वी चंदेला, गुरप्रीत सिंग आणि प्रकाश नंजप्पा या आॅलिम्पिक पात्रता मिळवलेल्या खेळाडूंचीही उपस्थिती होती.सध्या जागतिक बॉक्सिंग संघटनेने (आयबा) भारतीय बॉक्सिंग संघटनेला अपात्र केले असल्याने भारतीय बॉक्सर्सना रिओ आॅलिम्पिकमध्ये आयबाच्या ध्वजाखाली सहभागी व्हावे लागणार आहे. संघटनेच्या वादाविषयी विचारलेल्या प्रश्नावर थापा म्हणाला, ‘‘वैयक्तिकरीत्या मी आॅलिम्पिकसाठी खूप मेहनत घेतली आहे. एक खेळाडू म्हणून संघटनेच्या वादाविषयी मी जास्त विचार केलेला नाही. त्याचा माझ्या खेळावरही परिणाम होऊ दिला नाही. पण, आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होताना भारताच्या ध्वजाखाली खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. कारण हीच एक बाब सर्वाधिक आत्मविश्वास मिळवून देते. त्यामुळेच जेव्हा मी आशियाई स्पर्धेत सुवर्ण पटकावले तेव्हा भारताच्या ऐवजी आयबाचा झेंडा फडकल्यानंतर थोडा दु:खी होतो.’’ ‘‘त्याचप्रमाणे भारताच्या ध्वजासह खेळता येणार नसल्याचे दु:ख आहे.