शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

उत्कर्षने झुंजविले आॅलिम्पियन तोमरला

By admin | Updated: October 25, 2016 01:38 IST

महाराष्ट्राच्या उत्कर्ष काळेने ६१ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरूषांच्या फ्रिस्टाईल गटात रिओ आॅलिम्पियन संदीप तोमरला तगडे आव्हान देत नाकीनऊ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या उत्कर्ष काळेने ६१ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरूषांच्या फ्रिस्टाईल गटात रिओ आॅलिम्पियन संदीप तोमरला तगडे आव्हान देत नाकीनऊ आणले, पण शेवटी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे महाराष्ट्राच्या विक्रम कुऱ्हाडेने तब्बल १४ वर्षानंतर ग्रीको-रोमन प्रकारात राज्याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले. महिला गटात रेश्मा मानेने व सोनाली तोडकरने आपआपल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. गोंडा (उत्तर प्रदेश) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आज रेल्वेकडून खेळणारा महाराष्ट्राचा मल्ल उत्कर्ष काळेने आपल्या कामगिरीने संपूर्ण स्टेडियम डोक्यावर घेतले. त्याने रियो आॅलिम्पिकपटू तोमरला इतके झुंजविले की उत्कर्षच्या प्रत्येक डावावर प्रेक्षक टाळ्यांचा गजर करीत होते. तोमरने उत्कर्षविरूध्द झटापटी करीत ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात गुण संपादन केले. तोमरने उत्कर्षला ५-४ गुणांनी पराभूत केले. तत्पूर्वी, दिवसातील सर्वात रोमहर्षक लढत लंडन आॅलिम्पियन अमित कुमार आणि उत्कर्ष काळे यांच्यादरम्यान झाली. या उपांत्य फेरीत काळेने अनुभवी अमितला धूळ चारत खळबळ उडवून देत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे रेल्वेच्या विक्रम कुऱ्हाडेने ग्रीको रोमन प्रकारात ५९ वजन गटात हरियाणाच्या रविंदरला अटीतटीच्या लढतीत ५-० गुणांनी धुव्वा उडवित सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी २००१ मध्ये महाराष्ट्राच्या रवींद्र पाटीलने सुवर्णपदक जिंकले होते. महिला गटात महाराष्ट्राच्या रेश्मा माने हिने ६३ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. महिलांच्या ५८ किलो वजन गटात हरियाणाच्या मंजूने महाराष्ट्राच्या सोनाली तोडकरला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले.