Tokyo Olympics, Hockey: 49 वर्षांनी इतिहास घडला! टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:23 PM2021-08-01T19:23:00+5:302021-08-01T19:26:24+5:30

IND vs GBR Hockey Olympics Match: टोक्यो ऑलिंम्पिकचा आज 10 वा दिवस आहे. आज पीव्ही सिंधूने कास्य पदक पटकावले. यानंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने आनंदाची बातमी दिली आहे.

Tokyo Olympics: India Beat Britain 3-1 Hockey match, Enter Semi final after long 49 years | Tokyo Olympics, Hockey: 49 वर्षांनी इतिहास घडला! टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश

Tokyo Olympics, Hockey: 49 वर्षांनी इतिहास घडला! टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश

Next

टोक्यो ऑलिंम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पुरुषांच्या भारतीयहॉकी टीमने (Hockey Team India mens) इतिहास घडवला आहे. जवळपास 49 वर्षांनी भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 1972 मध्ये टीम इंडियाने हा कारनामा केला होता. (India Beat Britain 3-1, Face Belgium In Semi final)

टोक्यो ऑलिंम्पिकचा आज 10 वा दिवस आहे. आज पीव्ही सिंधूने कास्य पदक पटकावले. यानंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने आनंदाची बातमी दिली आहे. टीम इंडियाने आक्रमक खेळ करत सातव्या आणि 16 व्या मिनिटाला ब्रिटनवर गोल नोंदविले आणि आघाडी घेतली. भारताकडून दिलप्रीत सिंग आणि  गुरजंत सिंग यांनी हे गोल नोंदविले. 

P V Sindhu: 'लढाई संपलेली नाही, आता लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिक!', टोकियोत पदक जिंकल्यानंतर सिंधूची प्रेरणादायी प्रतिक्रिया 

यानंतर ग्रेट ब्रिटनने भारताने घेतलेली बढत कमी करत पहिला गोल नोंदविला. 45 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. सॅम्युअल इयानने हा गोल केला. त्या आधी 44 व्या मिनिटाला ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, भारतीयांनी हा गोल होऊ दिला नाही. सुरेंदर कुमार याने खुबीने गोल अडविला. 

यानंतर 57 व्या मिनिटाला भारताने संधी साधून ब्रिटनवर 3-1 ने आघाडी मिळवली. हार्दिकने 57 व्या मिनिटाला गोल करत ब्रिटनला पराभवाच्या छायेत लोटले. 

Tokyo Olympic, PV Sindhu : भारताची 'बॅडमिंटनक्वीन' पी.व्ही सिंधूनं जिंकलं कांस्य पदक, चीनी खेळाडूला नमवलं; रचला इतिहास

1972 नंतर पहिल्यांदाच सेमीमध्ये 
भारतीय संघाने 1972 मध्ये सेमीमध्ये प्रवेश केला होता. जर्मनीच्या म्युनिचमध्ये पाकिस्तानविरोधात ही लढत झाली होती. परंतू भारताने हा सामना 0-2 ने गमावला होता. 

1980 मध्ये सेमीफायनल खेळविली गेली नव्हती. राऊंड रॉबिन लीगनुसार पहिल्या दोन संघांमध्ये सुवर्ण पदकांसाठी आणि तिसऱ्या आणि चौथ्या संघामध्ये कास्य पदकासाठी सामने खेळविण्यात आले होते. मॉस्कोमध्ये झालेल्या या ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या सहाच संघांनी भाग घेतला होता. 
 

Web Title: Tokyo Olympics: India Beat Britain 3-1 Hockey match, Enter Semi final after long 49 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app