शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी आज ‘करा वा मरा’

By admin | Updated: October 11, 2016 04:35 IST

एएफसीनंतर ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेतही पराभवाची मालिका कायम राखणाऱ्या १७ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघासाठी मंगळवारी

पणजी : एएफसीनंतर ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेतही पराभवाची मालिका कायम राखणाऱ्या १७ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघासाठी मंगळवारी चीनविरुद्धचा सामना जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. हा सामना भारतासाठी ‘करा वा मरा’ अशा स्वरूपाचा आहे. ब्रिक्स स्पर्धेत भारताने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे हा संघ विजयाच्या शोधात असेल. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ‘ड्रॉ’ करणाऱ्या चीनविरुद्ध भारतीय संघाला व्यूहरचनेत काहीसा बदल करावा लागेल. चीनचे तीन सामन्यांतून एक गुण आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला अजून खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे भारताला शर्यतीत कायम राहण्यासाठी उद्याचा सामना महत्त्वपूर्ण असेल.याआधी, भारतीय संघाने रशिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांविरुद्ध अत्यंत जवळ आलेले सामने गमावले. त्यांनी बऱ्याच संधी मिळवल्या होत्या; मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय संघाला गोल नोंदवण्यात अपयश आले. त्यामुळे संघाचे प्रशिक्षक निकोलई अ‍ॅडम आणि ‘सपोर्ट स्टाफ’ चिंतेत आहे. भारताचे सहायक प्रशिक्षक इतिबार इब्र्राहिमोव म्हणाले की, आम्ही रशिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सामने खेळले आहेत. या सामन्यांत आम्ही जिंकू शकलो नसलो, तरी आम्ही बऱ्याच संधी मिळवत प्रतिस्पर्धी संघांच्या बचावास व्यस्त ठेवले. आमचे खेळाडू संधीचा फायदा उठवू शकले नाहीत हीच चिंतेची बाब आहे. आता आम्हाला चीनविरुद्ध महत्त्वपूर्ण सामना खेळायचा आहे. संधी मिळाल्यावर गोल केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे आवश्यक आहे. खेळावर अधिक लक्ष केंद्रित करून संधीचा फायदा उठवावा, हेच आम्ही खेळाडूंना सांगितले आहे.