शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडचा रोमांचक विजय

By admin | Updated: October 20, 2016 06:35 IST

उपांत्य फेरी निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरलेल्या सामन्यात थायलंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या ‘ब’ गटात जपानचे कडवे आव्हान ३७-३३ असे परतावले.

अहमदाबाद : उपांत्य फेरी निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरलेल्या सामन्यात थायलंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या ‘ब’ गटात जपानचे कडवे आव्हान ३७-३३ असे परतावले. या शानदार विजयासह थायलंडने बलाढ्य इराणला पिछाडीवर टाकताना गटविजेतेपद पटकावले. आता, उपांत्य फेरीत थायलंडपुढे यजमान भारताचे तगडे आव्हान असेल. तर, दुसरीकडे इराण विरुध्द कोरिया असा रंगतदार सामना रंगेल.जपान व कोरियासाठी उपांत्य फेरी गाठण्यास विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. अत्यंत अटीतटीच्या रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी तोडिस तोड खेळ करताना सामन्याची रंगत अखेरपर्यंत कायम राखली. परंतु, शेवटच्या दोन मिनिटांमध्ये थायलंडने आक्रमक खेळ करताना मोक्याच्यावेळी गुणांची कमाई करुन ३३-३२ अशा आघाडीवरुन ३७-३३ असे भक्कम वर्चस्व मिळवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. कर्णधार खोमसान थाँगखम याने शेवटच्या दोन मिनिटात निर्णायक चढाई करताना जपानला दबावाखाली आणले.मध्यंतराला १७-१७ अशी बरोबरी राहिलेल्या या सामन्यात खोमसानने सर्वाधिक १० गुण मिळवताना शानदार चढाया केल्या. संती बनचोएत यानेही ५ गुणांची कमाई करताना खोमसानला चांगली साथ दिली. जपानकडून हुकमी खेळाडू कझुहिरो तकानोने शानदार अष्टपैलू खेळ केला. परंतु, त्याची झुंज अपयशी ठरली. (वृत्तसंस्था) >बांगलादेशचा विजयी निरोपकेवळ औपचारिकता राहिलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत ‘अ’ गटाच्या अखेरच्या लढतीत बांगलादेशने अर्जेंटिनाचा ६७-२६ असा फडशा पाडून विजयी निरोप घेतला. बांगलादेशने या स्पर्धेत ३ विजय २ पराभव अशी कामगिरी करताना १६ गुणांची कमाई केली. तर, अर्जेटिनाला एकाही सामन्यात बाजी मारण्यात यश आले नाही. सुरुवातीपासूनच एकतर्फी झालेल्या या लढतीत बांगलादेशने अपेक्षित वर्चस्व मिळवताना अर्जेंटिनाला दबावाखाली ठेवले. बांगलादेशच्या आक्रमक धडाक्यापुढे अर्जेंटिनाला अखेरपर्यंत सूर गवसला नाही. मध्यंतरलाच बांगलादेशने ३३-१५ अशी आघाडी घेत अर्जेंटिनाच्या आव्हानातली हवा काढली.