स्वत:च्या फिटनेससाठी आज धावणार हजारो धावक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:22 PM2020-08-01T23:22:48+5:302020-08-01T23:23:03+5:30

‘लोकमत’चा महामॅरेथॉन । व्हर्च्युअल फ्रीडम रन

Thousands of runners will run today for their own fitness | स्वत:च्या फिटनेससाठी आज धावणार हजारो धावक

स्वत:च्या फिटनेससाठी आज धावणार हजारो धावक

Next

नागपूर : लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल फ्रीडम रन ही फक्त एक धाव नाही. तो एक उत्सव आहे स्वातंत्र्याचा. स्वातंत्र्य फीट जगण्याचे... स्वातंत्र्य स्वत:वर विजय मिळविण्याचे... रविवार, दि. २ आॅगस्ट रोजी फिटनेसविषयी जनजागृती करणाऱ्या या उपक्रमात महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील धावक सहभागी होत असून, लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल फ्रीडम रन हा उपक्रम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मॅरेथॉन शृंखला होत आहे.

लोकमत महामॅरेथॉनची टीम हा रन संस्मरणीय बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे. स. ८ वा. रिलॅक्स झील टीमतर्फे धावपटूंसाठी वार्मअप घेण्यात येईल. यासाठी या लिंकवर जॉईन व्हावे. सायं. ५ वा. याच लिंकवर डीजे रणजित यांची डीजे पार्टी होत आहे. तसेच सायं. ६ वा. या स्पर्धेतील विजेत्यांचा विजय साजरा करण्यासाठी लोकमत महामॅरेथॉन या फेसबुक पेजवर पुन्हा जॉईन व्हा आणि सहस्रनाम या रॉक बॅण्ड सादरीकरणासोबत यशाचा आनंद साजरा द्विगुणित करणार आहे. सर्व धावकांनी धाव पूर्ण झाल्यानंतर या लिंकवर तुमचा स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे.
 

Web Title: Thousands of runners will run today for their own fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app