शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आरसीबीच्या अंतिम ११ जणांत स्थान मिळण्याची आशा नव्हती

By admin | Updated: May 30, 2015 01:43 IST

सर्वांत युवा फलंदाज सर्फराजने ख्रिस गेल, अ‍ॅबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यासारख्या स्फोटक फलंदाजांमुळे अंतिम ११ जणांत स्थान मिळवण्याचा विश्वास वाटत नव्हता, असे सांगितले.

लखनौ : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये आपल्या कामगिरीने विशेष ठसा उमटवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सर्वांत युवा फलंदाज सर्फराजने ख्रिस गेल, अ‍ॅबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यासारख्या स्फोटक फलंदाजांमुळे अंतिम ११ जणांत स्थान मिळवण्याचा विश्वास वाटत नव्हता, असे सांगितले. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण असणाऱ्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी दिल्याने आपला आत्मविश्वास उंचावल्याचेही तो म्हणाला.उत्तर प्रदेशच्या आजमगढस्थित आपले गाव बासूपूर येथे आलेल्या सर्फराजने त्याचे आयपीएलचे पहिले पर्व खूप चांगले ठरले आणि त्यादरम्यान सर्वच सीनियर खेळाडूंनी खूप मदत केल्याचे सांगितले.आरसीबीने ५0 लाख रुपयांत खरेदी केलेला सर्फराज म्हणाला, ‘‘सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची कोणाला लगेच संधी मिळत नाही. त्या क्रमांकावर सर्वसाधारणपणे सीनियर किंवा अनुभवी खेळाडूला संधी दिले जाते. त्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजावर जास्त दबाव असतो. या स्थानावर मला फलंदाजीची संधी मिळाल्याने मी नशीबवान आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे; परंतु माझे पाय मात्र जमिनीवरच आहे.’’जागतिक पातळीवरील गोलंदाजांचा समावेश असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध साखळी लढतीत २१ चेंडूंत ४५ धावा फटकावताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणाऱ्या या फलंदाजाने म्हटले, ‘‘गेल, डिव्हिलियर्स आणि कोहली यांनी मला फलंदाजांचे अनेक कौशल्य शिकवले. येणाऱ्या काळात मी ते लक्षात ठेवून त्यावर काम करेल. त्यामुळे माझा खेळ आणखी चांगला होईल. याची मला आशा वाटते.’’आयपीएलसारख्या मोठ्या व्यासपीठावर गेल, डिव्हिलियर्स आणि कोहलीसारखे जबरदस्त खेळाडू असतानाही आपल्यावर कोणताही दबाव नव्हता. आपले वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपला स्वत:वर विश्वास होता, असे आपल्या पहिल्या आयपीएल हंगामात चांगल्या कामगिरीच्या दबावाविषयी सर्फराजने सांगितले. (वृत्तसंस्था)