कोहलीविरुद्ध माझ्यावरही दडपण आले असते : अक्रम

By Admin | Updated: May 28, 2016 03:59 IST2016-05-28T03:59:48+5:302016-05-28T03:59:48+5:30

आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीपुढे प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या चिंधड्या उडत आहेत. त्याचा हा सुपर फॉर्मपाहून क्रिकेटचा एक काळ

There was a lot of pressure on me against Kohli: Akram | कोहलीविरुद्ध माझ्यावरही दडपण आले असते : अक्रम

कोहलीविरुद्ध माझ्यावरही दडपण आले असते : अक्रम

आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीपुढे प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या चिंधड्या उडत आहेत. त्याचा हा सुपर फॉर्मपाहून क्रिकेटचा एक काळ फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून गाजवलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमलाही अचंबित झाला आहे. नुकताच त्याने, ‘‘जर मला कोहलीला गोलंदाजी करावी लागली असती तर मी देखील दडपणाखाली आलो असतो,’’ असे विधान केले.
कोहलीच्या खेळीचे कौतुक करताना अक्रम म्हणाला, ‘‘कोहलीचे तंत्र आणि स्वत:च्या क्षमतेवर असलेला विश्वास कमालीचा आहे. त्याला रिव्हर्स फटका आणि आडव्या बॅटने खेळताना फार कमी वेळा पाहिले आहे. तो नेहमी क्रिकेटचे पारंपारीक फटके खेळतो आणि त्याला गोलंदाजी करण्याची वेळ माझ्यावर आली असती तर माझ्यावरही दडपण आले असते. एकदिवसीय सामन्यात कोहली व सचिनला गोलंदाजी करणे कठिण झाले असते. कारण दोघेही चुकीला संधी देत नाही.’’

Web Title: There was a lot of pressure on me against Kohli: Akram