शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दबावात खेळण्याची सवय झाली : महेंद्रसिंह धोनी

By admin | Updated: March 8, 2015 01:41 IST

मी उत्कृष्ट खेळ करून संघाला विजय मिळवून देऊ शकतो,’’ असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले.

पर्थ : ‘‘भारतीय संघ अडचणीत असताना माझ्यावरही दबाव येतो; मात्र आता नेहमीच दबावात खेळ करण्याची सवय झाली आहे़ त्यामुळेच भारतीय संघ अडचणीत आला, की मी उत्कृष्ट खेळ करून संघाला विजय मिळवून देऊ शकतो,’’ असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले.शुक्रवारी वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या वर्ल्डकपमधील लढतीत संघ अडचणीत असताना धोनीने कर्णधारास साजेशी नाबाद ४५ धावांची खेळी करून टीमला विजय मिळवून दिला़ धोनी पुढे म्हणाला, ‘‘सर्वांना वाटते, की माझ्यावर दबाव येत नाही;मात्र सामन्यात माझ्यावरही दबाव येतो; मात्र अशा परिस्थितीत कसा खेळ करायचा याचे कसब अवगत केले आहे़ याच कारणामुळे मी कठीण परिस्थितीतसुद्धा आपली विकेट गमावत नाही़’’ धोनीने पुढे सांगितले, की सन २००६च्या पाकिस्तान दौऱ्यानंतर माझ्या फलंदाजीत बरीच सुधारणा झाली आहे़ यानंतर मी सलग तळाच्या क्रमवारीत फलंदाजी केली आहे़ माझा नंबर बऱ्याच वेळा ३० षटकांच्या नंतरच येतो़ तेव्हा मला परिस्थितीनुसार खेळण्यास भाग पडते़ प्रथम फलंदाजी असल्यास मी वेगाने धावा काढतो आणि लक्ष्याचा पाठलाग करण्याची वेळ असली तरी मला विकेट राखून खेळणे गरजेचे असते, असेही हा कर्णधार म्हणाला़ (वृत्तसंस्था)पाचव्या क्रमांकासाठी रैना उत्कृष्ट पर्यायच्युवराजसिंग भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर सुरेश रैनाच पाचव्या क्रमांकासाठी उत्कृष्ट पर्याय आहे, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने म्हटले आहे़च्वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत सुरेश रैना २२ धावा काढून ड्वेन स्मिथच्या गोलंदाजीवर शॉर्टपिच चेंडूवर बाद झाला होता़ त्यामुळे या खेळाडूला अशा प्रकारचे चेंडू खेळता येत नाहीत, असा मुद्दा मीडियाने उपस्थित केला होता़च्धोनी म्हणाला, की अन्य संघांतील खेळाडूसुद्धा शॉर्टपिच चेंडूवर बाद होतात, तेव्हा कुणीही लक्ष देत नाही; मात्र रैना केवळ एकदा या चेंडूवर बाद झाला तर मोठा विषय बनला, हे चुकीचे आहे़ रैना सध्या चांगली फलंदाजी करीत आहे़ पुढच्या सामन्यात तो नक्कीच संघाच्या विजयात विशेष योगदान देईल, असा विश्वासही धोनीने व्यक्त केला़