शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या खेळपट्टीत काहीच चुकीचे दिसले नाही

By admin | Updated: December 13, 2015 23:24 IST

आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी भारताची बाजू घेताना नागपूरच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीमध्ये काहीच चुकीचे नसल्याचे म्हटले आहे

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी भारताची बाजू घेताना नागपूरच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीमध्ये काहीच चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. नागपूर कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा तीन दिवसांमध्ये पराभव केला होता. चॅपेल म्हणाले, ‘‘जगभरात वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांचे डोळे मिटून समर्थन केले जाते.’’व्हीसीए जामठाची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल होती. भारताने तीन दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा १२४ धावांनी पराभव केला. आयसीसीने खेळपट्टी ‘खराब’ असल्याचे स्पष्ट करताना याबाबत बीसीसीआयकडून अहवाल मागविला होता. ‘‘चॅपेल यांनी भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी खेळपट्टीबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. शास्त्री व कोहलीने म्हटले होते, की आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काही सामने तीन दिवसांमध्ये संपतात. त्यामुळे नागपूरच्या खेळपट्टीमध्ये काही चुकीचे आहे, असे वाटत नाही.’’नागपूर व अ‍ॅडिलेड येथील खेळपट्ट्यांबाबत चर्वितचर्वण सुरू आहे. कसोटी सामने झटपट संपत आहेत, यासाठी खेळपट्टी जबाबदार आहे की खेळाडू? याबाबत बोलताना चॅपेल म्हणाले, ‘‘भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी योग्य उत्तर दिले. आयसीसी जर नागपूरच्या खेळपट्टीची चौकशी करीत असेल तर अ‍ॅडिलेडच्या खेळपट्टीची चौकशी का करीत नाही. तेथेही सामना कमी वेळेत संपला होता.’’गेल्या महिन्यात अ‍ॅडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा तीन दिवसांमध्ये पराभव केला होता. जर खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल असेल तर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीच्या तुलनेत खराब कशी ठरू शकते, असा सवाल चॅपेल यांनी उपस्थित केला आहे. चॅपेल म्हणाले, ‘‘एक चांगला फलंदाज कुठल्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करीत आणि कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असतो. त्याचा त्याला अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे. जर खेळपट्टी पहिल्या दिवशी फिरकीला अनुकूल असेल तर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीच्या तुलनेत ती खराब कशी ठरवता येईल. यामुळे चांगली खेळपट्टी कुठली, असा प्रश्न उपस्थित होतो. बॅट व बॉलमध्ये लढत अनुभवण्याची संधी देणारी खेळपट्टी चांगली असते. याचा अर्थ प्रत्येक विभागानुसार चांगली खेळपट्टी वेगवेगळी असू शकते. काही स्थळांवर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते तर काही स्थळांवर फिरकीपटूंसाठी सहायक असते.’’ चॅपेल यांनी आंतरराष्ट्रीय संघांना क्युरेटरला दोष देण्यापेक्षा खेळाडूंच्या तंत्रावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. (वृत्तसंस्था)