शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कुंबळेंबरोबर कुठलेही मतभेद नाहीत - विराट कोहली

By admin | Updated: June 3, 2017 20:20 IST

मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याबरोबर माझे कुठलेही मतभेद नाहीत. माझ्यात आणि प्रशिक्षकांमध्ये बेबनाव झाल्याच्या सध्या सुरु असलेल्या बातम्या निव्वळ अफवा आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 3 - मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याबरोबर माझे कुठलेही मतभेद नाहीत. माझ्यात आणि प्रशिक्षकांमध्ये बेबनाव झाल्याच्या सध्या सुरु असलेल्या बातम्या निव्वळ अफवा आहेत असे कर्णधार विराट कोहलीने शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत  बोलताना कोहलीने मतभेदांच्या बातम्यांचे खंडन केले. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने रविवारपासून भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अभियानाला सुरुवात होणार आहे. 
 
ड्रेसिंग रुमशी संबंध नसताना अनेकांनी ब-याच गोष्टी लिहील्या आहेत. विविध तर्क-विर्तक लावले आहेत. ड्रेसिंगरुममध्ये अशी कुठलीही समस्या नाही. लोक उगाचच वाद का निर्माण करतात ते मला कळत नाही ? संघाचे सर्व लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर आहे असे कोहलीने या वादासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 
 
काही दिवसांपूर्वी कर्णधार विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडू मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंवर नाराज असल्याचे वृत्त आले होते. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाची पद्धत वरिष्ठ खेळाडूंना पटत नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते. बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर असणारे सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या वादामध्ये कुंबळे आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये समेट घडवून आणणार असल्याचे बोलले जात होते. 
 
या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक कुंबळे यांनी संघाच्या इन्डोअर सरावादरम्यान कर्णधार कोहलीकडून थ्रोडाऊनचा सराव करुन घेतला. कोहली एकाग्रचित्ताने फलंदाजी करीत होता. कुंबळे कर्णधाराला थ्रोडाऊनचा सराव देत होते, हे या सत्राचे विशेष आकर्षण होते. कोहलीने सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने फलंदाजीचा सराव केला. सत्रादरम्यान त्यांच्यादरम्यान मतभेद आहेत, असे निदर्शनास आले नाही. ड्राईव्हचा सराव केल्यानंतर कोहलीने काही स्केअर आॅफ द विकेट फटके खेळण्याचा सराव केला. कुंबळेने कर्णधारासोबत जवळजवळ २० मिनिटे वेळ घालविल्यानंतर दुसऱ्या नेट््सकडे मोर्चा वळवला.