शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगावमधील ४४ कुस्तीगीरांची निवड

By admin | Updated: November 2, 2016 01:22 IST

पोखरी (ता.आंबेगाव) येथे नुकत्याच तालुका पातळीवरील महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडल्या.

डिंभे : आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ व पोखरी ग्रामस्थांच्या वतीने पोखरी (ता.आंबेगाव) येथे नुकत्याच तालुका पातळीवरील महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण सहभागी झालेल्या ८७ पहिलवानांपैकी ४४ पहिलवानांची वजनगटानुसार जिल्हा पातळीवरील स्पर्धांसाठी निवड झाली असून, या स्पर्धा पुण्यातील मारुंजी येथे पार पडणार आहेत. विजयी पहिलवानांस जिल्हा कुस्ती स्पर्धेत आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळणार आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील पोखरी येथे आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ व पोखरी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी (दि.३१) आंबेगाव तालुका केसरी निवडचाचणी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धामध्ये तालुक्यातून एकूण ९५ कुस्तीगीरांनी सहभाग नोंदविला. कुमारगटातील १४ वयोगट, १७ वयोगटामध्ये व वरिष्ठगट गादी व माती विभाग याप्रमाणे २५ किलो वजनापासून १२५ किलो वजनापर्यंत या स्पर्धा खेळविण्यात आल्या. वयोगट व वजनानुसार पार पडलेल्या या स्पर्धामध्ये एकूण ४४ पहिलवान जिल्हा पातळी निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील होतकरू कुस्तीगीरांना या स्पर्धेमुळे जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळाली असून, प्रथमत:च तालुक्याच्या पश्चिम भागात निवडचाचणी कुस्ती स्पर्धा भरविल्याने ग्रामीण भागातील अनेक कुस्तीगीर या स्पर्धांत सहभागी झाले होते.पोखरी येथे पार पडलेल्या आंबेगाव तालुका निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्याक्ष मारुती भवारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष जयसिंग एरंडे, राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, मधूअप्पा बोऱ्हाडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, पुणे जिल्हा परिषद उपसभापती व शिवसेना नेते अरुण गिरे, पोखरीचे उपसरपंच राहुल भागीत, तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष पै. राजेंद्र पाबळे, उपाध्यक्ष पै. विलास टेमगिरे, कार्यवाह पै. चिंतामण कोळप, पुणे जिल्हा विभागीय समिती सदस्य शरद गाडे, इत्यादी मान्यवर व विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते, परिसरातील माजी नामांकित पहिलवान व पोखरी ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)