वृत्त, वल्ली आणि व्यक्ती: ‘चेकमेट’ची राणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 08:04 AM2022-08-21T08:04:05+5:302022-08-21T08:06:08+5:30

कपिलदेवची झिम्बाब्वेविरुद्धची नाबाद १७५ धावांची निर्णायक खेळी आठवते का? त्या खेळीच्या जोरावर भारताने ५ बाद १७ धावा अशा प्रतिकूल स्थितीतून भरारी घेत झिम्बाब्वेला तर नमवलेच

The indian Queen of chess tania sachdev | वृत्त, वल्ली आणि व्यक्ती: ‘चेकमेट’ची राणी

वृत्त, वल्ली आणि व्यक्ती: ‘चेकमेट’ची राणी

googlenewsNext

रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादक

कपिलदेवची झिम्बाब्वेविरुद्धची नाबाद १७५ धावांची निर्णायक खेळी आठवते का? त्या खेळीच्या जोरावर भारताने ५ बाद १७ धावा अशा प्रतिकूल स्थितीतून भरारी घेत झिम्बाब्वेला तर नमवलेच, पण विश्वचषकालाही गवसणी घातली. अगदी अशीच निर्णायक खेळी... अर्थात ‘चाल’ चेन्नईतील बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पाहण्यास मिळाली. निर्णायक चालीच्या जोरावर भारतीय महिला संघाने स्पर्धेच्या ४४ वर्षात पहिल्यांदाच पदक जिंकताना कांस्य पदक मिळवले. ती निर्णायक चाल खेळली होती दिल्लीची तानिया सचदेवने हंगेरीविरुद्धच्या चौथ्या फेरीत कर्णधार कोनेरु हम्पीसह द्रोणावली हरिका व आर. वैशाली यांना आपापल्या सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली होती. परंतु, तानियाने झोका गाल हिचा शानदार पराभव केला आणि भारताला विजयी केले. नंतर भारतीयांनी कांस्य पदक निश्चित करत इतिहास घडवला. 

तानियाला वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बुद्धिबळाची आवड लागली ती आई अंजू यांच्यामुळे. के. सी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरविले. आशियाई ज्युनिअर्सचे जेतेपद पटकावत तानिया प्रसिद्धीझोतात आली. तिचे सौंदर्य पटावरील मोहऱ्यांना भावत असावे, अशा सादगीने ती समोरच्यालाही ‘चेकमेट’ करत सुटते. 

तानियाचे यश 
२००६,२००७ राष्ट्रीय महिला प्रीमियर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद
२००७ आशियाई अजिंक्यपद
२००९ अर्जुन पुरस्कार सन्मानित
२०१६ महिला राष्ट्रकुल चॅम्पियन
२००८ भारतीय बुद्धिबळ ऑलिम्पियाड संघात
२०१२ महिला बुद्धिबळ ऑलिम्पियाड बोर्ड-३ मध्ये वैयक्तिक कांस्य 
२०१५ आशियाई महिला रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक
२०१९ राष्ट्रकुल महिला बुद्धिबळ जेतेपद
२०२२ फिडे ऑलिम्पियाड सांघिक कांस्य पदक

Web Title: The indian Queen of chess tania sachdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.