शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
2
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
3
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
4
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
5
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
6
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
7
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
8
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
9
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
10
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
11
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
12
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
13
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
14
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
15
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
16
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

CWG 2022:'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 16:56 IST

राज्य सरकारने खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांच्या रकमेतही वाढ केली आहे.

नवी दिल्ली : अलीकडेच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले. राज्यातील सांगली जिल्ह्यातील संकेत सरगर याने भारतासाठी पहिले पदक जिंकले होते. इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 61 पदके पटकावली, ज्यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य व २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण 7 खेळाडूंनी पदके जिंकली असून त्यांना महाराष्ट्र सरकारने मोठे बक्षीस जाहीर केले आहे. 

राज्यातील या पदकविजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने आधी जाहीर केलेल्या रकमेत मोठी वाढ केली आहे. सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रथम 12 लाख 50 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आता त्यातवाढ करून थेट 50 लाख एवढे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांची बक्षिसाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली. 

प्रशिक्षकांच्या बक्षिसातही केली वाढ यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 14 खेळाडू सहभागी झाले होते. यातील 7 खेळाडूंना पदक जिंकण्यात यश आले. पदकविजेत्या खेळाडूंना केंद्र सरकारने 30 लाख तर महाराष्ट्र सरकारने 12 लाख 50 हजार रूपये देण्याचे जाहीर केले होते. या बक्षीसात महाराष्ट्र सरकारने विक्रमी वाढ केली असून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. तसेच रौप्य पदक विजेत्यांना 7 लाखांहून 30 लाख देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय कांस्य पदक विजेत्यांना 5 लाखांहून आता 20 लाख दिले जाणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे खेळाडूंच्या प्रशिक्षकांना देखील तीन लाखाच्या जागी 12 लाख देण्यात येणार आहेत.  

देशासाठी सुवर्णपदक जिंकणारे शिलेदार मिराबाई चानू ( वेटलिफ्टिंग), जेरेमी लालरीनुंगा ( वेटलिफ्टिंग), अचिंता शेऊली ( वेटलिफ्टिंग), लॉन बॉल महिला सांघिक, पुरूष सांघिक टेबल टेनिस, सुधीर ( पॅरा पॉवरलिफ्टिंग), बजरंग पुनिया ( कुस्ती), साक्षी मलिक ( कुस्ती), दीपक पुनिया ( कुस्ती),  रवी कुमार दहिया ( कुस्ती), विनेश फोगाट ( कुस्ती), नवीन मलिक ( कुस्ती), भाविना पटेल ( पॅरा टेबल टेनिस), नितू घांघास ( बॉक्सिंग), अमित पांघल ( बॉक्सिंग), एलडोस पॉल ( तिहेरी उडी), निखत जरीन ( बॉक्सिंग), मिश्र दुहेरी टेबल टेनिस, पी व्ही सिंधू ( बॅडमिंटन), लक्ष्य सेन ( बॅडमिंटन) , पुरुष दुहेरी ( बॅडमिंटन) , अचंथा शरथ कमल ( टेबल टेनिस). 

देशासाठी रौप्यपदक जिंकणारे शिलेदार संकेत सरगर ( वेटलिफ्टिंग), बिंद्यारानी देवी ( वेटलिफ्टिंग), शुशिला लिकमबाम ( ज्युदो), विकास ठाकूर ( वेटलिफ्टिंग), मिश्र सांघिक ( बॅडमिंटन), तुलिका मान ( ज्युदो), मुरली श्रीशंकर ( लांब उडी), अंशु मलिक ( कुस्ती), प्रियांका गोस्वामी ( १०००० मीटर चालण्याची शर्यत), अविनाश साबळे ( ३००० मीटर स्टीपलचेस), लॉन बॉल पुरुष सांघिक, मिश्र दुहेरी ( टेबल टेनिस), महिला क्रिकेट, अब्दुल्ला अबूबाकेर ( तिहेरी उडी), सागर अहलावत ( बॉक्सिंग), पुरुष हॉकी संघ.  देशासाठी कांस्यपदक जिंकणारे शिलेदार गुरुराजा पुजारी ( वेटलिफ्टिंग), विजय कुमार यादव ( ज्युदो), हरजिंदर कौर ( वेटलिफ्टिंग), लवप्रीत सिंग( वेटलिफ्टिंग), सौरव घोषाल ( स्क्वॉश), गुरदीप सिंग ( वेटलिफ्टिंग), तेजस्वीन शंकर ( उंच उडी), दिव्या काकरन ( कुस्ती), मोहित ग्रेवाल ( कुस्ती), जास्मिन ( बॉक्सिंग), पूजा गेहलोट ( कुस्ती), पूजा सिहाग ( कुस्ती), मोहम्मद हुस्सामुद्दीन ( बॉक्सिंग), दीपक नेहरा ( कुस्ती), सोनालबेन पटेल ( पॅरा टेबल टेनिस), रोहित टोकास ( बॉक्सिंग), महिला हॉकी, संदीप कुमार ( १०००० मीटर चालण्याची शर्यत), अन्नू राणी ( भालाफेक), मिश्र दुहेरी ( स्क्वॉश), श्रीकांत किदम्बी ( बॅडमिंटन), महिला दुहेरी ( बॅडमिंटन), साथियन ज्ञानसेकरन ( टेबल टेनिस). 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाWeightliftingवेटलिफ्टिंगMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतGirish Mahajanगिरीश महाजनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे