शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवासन करणार बीसीसीआयचे प्रतिनिधित्व

By admin | Updated: June 22, 2015 01:28 IST

श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदापासून रोखण्यात आले असले तरी, या आठवड्यात बार्बाडोसमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत

दुबई : श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदापासून रोखण्यात आले असले तरी, या आठवड्यात बार्बाडोसमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत जगमोहन दालमिया यांच्या स्थानी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते सज्ज आहेत.आयसीसी पत्रकानुसार २४ ते २६ जून या कालावधीत होणाऱ्या बैठकीत आयसीसीचे चेअरमन श्रीनिवासन यांच्या नावाचा उल्लेख बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून करण्यात आलेला आहे. श्रीनिवासन आयसीसीचे प्रमुख म्हणून बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. मार्चमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे दालमिया या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व का करणार नाहीत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर सोमवारी होणाऱ्या मुख्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. वार्षिक कॉन्फरन्सचे यजमानपद वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड भूषवीत आहे. आयसीसीची वार्षिक बैठक प्रथमच वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. या बैठकीत आयसीसीच्या ५० पेक्षा अधिक सदस्यांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची आशा आहे. आयसीसीच्या अजेंडामध्ये आयसीसी मेमोरेंडम व आर्टिकल आॅफ असोसिएशनमध्ये बदल, आयसीसीच्या नव्या अध्यक्षांच्या पदग्रहणावर शिक्कामोर्तब, सर्बियाला आयसीसीचे असोसिएट सदस्यपद बहाल करणे, श्रीलंका क्रिकेट व अमेरिका क्रिकेट संघटनांच्या स्थितीबाबत माहिती, भ्रष्टाचार विरोधी व सुरक्षा समितीच्या चेअरमनचा अहवाल आणि २०१५ नंतर आयसीसीच्या रणनीतीवर चर्चा आदींचा समावेश आहे.