स्क्वॅश : घोषाल उपांत्य फेरीत, पल्लीकल पराभूत

By Admin | Updated: July 28, 2014 03:37 IST2014-07-28T03:37:54+5:302014-07-28T03:37:54+5:30

भारताच्या सौरभ घोषालने ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॅशमध्ये एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

Squash: Ghoshal defeats Pallikal in the semifinals | स्क्वॅश : घोषाल उपांत्य फेरीत, पल्लीकल पराभूत

स्क्वॅश : घोषाल उपांत्य फेरीत, पल्लीकल पराभूत

भारताच्या सौरभ घोषालने ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॅशमध्ये एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दीपिका पल्लीकलला महिलांच्या एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या मानांकित घोषालने उपांत्यपूर्व फेरीत १२व्या मानांकित न्यूझिलंडच्या कॅम्पबेल ग्रेसनची झुंज ३-२ ने मोडून काढली. घोषालने या लढतीत ग्रेसनचा ८-११, ७-११, ११-६, ११-८, ११-६ ने पराभव केला. घोषाल राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. घोषालला उपांत्य फेरीत इंग्लंडच्या जेम्स विल्सट्रोपच्या आव्हानाला
सामोरे जावे लागणार आहे. २० वर्षीय अनाका अलंकामोनी महिलांच्या प्लेट लढतीत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. अलंकामोनीने पापुआच्या एली व्हेबचा ११-४, ११-१, ११-२ ने पराभव केला. पुढच्या फेरीत तिला श्रीलंकेच्या मिथिलिया मथसारानीच्या आव्हानाला सामोरे जावे
लागणार आहे.

 

Web Title: Squash: Ghoshal defeats Pallikal in the semifinals