शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

अजून काही वर्ष टीम इंडियासाठी खेळण्याचा युवराज सिंगला विश्वास

By admin | Updated: June 14, 2017 20:47 IST

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून टीम इंडियाचा सामना उद्या बांगलादेशच्या संघासोबत होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

बर्मिगहॅम, दि. 14 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून टीम इंडियाचा सामना उद्या बांगलादेशच्या संघासोबत होणार आहे. भारताचा डॅशिंग फलंदाज युवराज सिंगचा हा 300 वा एकदिवसीय सामना असणार आहे. यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना भारताच्या या स्टायलिश फलंदाजाने अजून काही वर्ष भारतासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  
 
बर्मिगहॅममध्ये होणा-या या महत्वाच्या सामन्यापूर्वी युवराजने पत्रकरांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. 300 व्या सामन्याबाबत बोलताना युवराज म्हणाला भारतासाठी खेळायला सुरूवात केली त्यावेळी केवळ एक सामना खेळून मी खूप आनंदी झालो होतो.  मला स्वतःचा खूप अभिमान वाटला होता. भारतासाठी खेळायला मिळाल्याने मी स्वतःला नशीबवान समजतो. संघातून बाहेर गेल्यानंतर पुन्हा भारतासाठी खेळण्याचा आनंद आहे, मी सध्या चांगला खेळत आहे, जोपर्यंत मी चांगला खेळत राहील मला भारतासाठी खेळायला आवडेल. आणखी काही वर्ष भारतासाठी खेळेल असा मला विश्वास यावेळी युवराजने व्यक्त केला. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जाण हा माझ्यातला सर्वात मोठा गुण असल्याचं कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात करून पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा युवराज म्हणाला.  
 
सेमीफायनलआधी युवराज सिंगने दाखवली सुपर पॉवर-
गुरुवारी भारत आणि बांगलादेशदरम्यान सेमीफायनल होणार आहे. दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी कसून सराव करत आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू एकीकडे मैदानात घाम गाळत असताना युवराज सिंगने मैदानाबाहेर आपली सुपर पॉवर दाखवली आहे. 
 
युवराज सिंगने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे बांगलादेश खेळाडूंसाठी एक चेतावणीच आहे. या व्हिडीओत युवराज सिंग आपल्याकडे सुपर पॉवर असल्याप्रमाणे आपोआप दरवाजा उघडत आहे, आणि बंदही करत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने हा व्हीडीओ शूट केला आहे. 
 
भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्या गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये उपांत्य सामना होणार आहे. या सामन्याआधी युवराज सिंहने हा विनोदी व्हिडीओ शेअर केला आहे. युवराज सिंग आपल्या विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. ड्रेसिंग रुममध्येही युवराज सिंग इतर खेळाडूंच्या खोड्या काढत असतो.