वेटलिफ्टिंगमध्ये सहावे पदक

By Admin | Updated: July 28, 2014 03:40 IST2014-07-28T03:40:54+5:302014-07-28T03:40:54+5:30

भारताच्या ओमकार ओटारीने ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनमध्ये पुरुषांच्या ६९ किलो वजन गटात कांस्यपदकाचा मान मिळविला.

Sixth medal in weightlifting | वेटलिफ्टिंगमध्ये सहावे पदक

वेटलिफ्टिंगमध्ये सहावे पदक

भारताच्या ओमकार ओटारीने ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनमध्ये पुरुषांच्या ६९ किलो वजन गटात कांस्यपदकाचा मान मिळविला. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील २६ वर्षीय ओमकार याने एकूण २९६ किलो वजन उचलले. भारताचे या स्पर्धेत भारोत्तोलनातील हे सहावे पदक ठरले. भारताने भारोत्तोलनमध्ये आतापर्यंत २ सुवर्ण, १ रौप्य व ३ कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत मलेशियाच्या मोहम्मद हफीफ मंसोरने एकूण ३०५ किलो वजन उचलताना सुवर्णपदकाचा मान मिळविला, तर नायजेरियाच्या यिंका अयेनुव्हाने ३०१ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकाविले.

Web Title: Sixth medal in weightlifting