शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पत्रकाराची तुलना गेलशी

By admin | Updated: January 12, 2016 04:15 IST

आॅन एअर आपल्या महिला मैत्रिणीशी गळाभेट घेतल्यामुळे आॅस्ट्रेलियातील एका टीव्ही पत्रकाराला टीकेचा सामना करावा लागत आहे. या पत्रकाराची तुलना आता वेस्ट इंडिजचा

मेलबोर्न : आॅन एअर आपल्या महिला मैत्रिणीशी गळाभेट घेतल्यामुळे आॅस्ट्रेलियातील एका टीव्ही पत्रकाराला टीकेचा सामना करावा लागत आहे. या पत्रकाराची तुलना आता वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल याच्याशी होत आहे. नुकतीच एका महिला पत्रकाराबद्दल आपत्तीजनक टीका केल्यामुळे गेल चर्चेत आला होता. या प्रकारामुळे चॅनल सेव्हनचा क्रीडा पत्रकार हामिश मॅक्लाचलन याला माफी मागावी लागली आहे. एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान हामिशने मैत्रीण मोनिको रादुलोविच हिच्याशी गळाभेट घेतली होती. विशेष म्हणजे हामिशने गळाभेट घेतली तेव्हा मोनिको कॅमेऱ्यावर काही तरी बोलण्याचा प्रयत्न करीत होती. हा प्रकार झाला तेव्हा मोनिको गोल्ड कोस्टवर मॅजिक मिलियन हॉर्स सेल येथे रिपोर्टिंग करीत होती. तेव्हा ४० वर्षीय हामिशही तेथे उपस्थित होता. तो हॉर्स रेस आणि आॅस्ट्रेलियन फुटबॉल लीगचे समालोचन करीत होता. येथे मोनिको घोड्यांच्या लिलाव कार्यक्रमात बोलत होती. तेव्हा हामिशने या महिला पत्रकाराची गळाभेट घेतली. या प्रकारानंतर त्याच्यावर टीका होत आहे. (वृत्तसंस्था)