शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना विल्यम्स अंतिम फेरीत

By admin | Updated: April 4, 2015 04:08 IST

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सने सिमोना हालेपचा पराभव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या

मियामी : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सने सिमोना हालेपचा पराभव करीत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष विभागात नोव्हाक जोकोव्हिच व जॉन इस्नर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळवले. सेरेनाने रुमानियाच्या सिमोना हालेपविरुद्ध ६-२, ४-६, ७-५ ने संघर्षपूर्ण विजय मिळवला. सेरेनाने मियामी ओपन स्पर्धेत दहाव्यांदा अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली. पुरुष विभागात अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या डेव्हिड फेररचा तर दुसऱ्या लढतीत अमेरिकेच्या जॉन इस्नेरने जपानच्या केई निशिकोईचा पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. जोकोव्हिचने फेररचा ७-५, ७-५ ने तर इस्नेरने जपानच्या निशिकोईचा ६-४, ६-३ ने पराभव केला. २०१०मध्ये अ‍ॅण्डी रोडिकनंतर अमेरिकन खेळाडूला मियामी ओपनमध्ये जेतेपद पटकावता आलेले नाही. इस्नरला या वेळी जेतेपदाची संधी आहे, पण त्यासाठी त्याला यानंतरचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. (वृत्तसंस्था)