शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनच्या पत्नीच्या उत्तराने सेहवाग झाला निरुत्तर

By admin | Updated: October 13, 2016 17:41 IST

कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर सेहवागने मजेशीर टिवट केले. सेहवागने आपल्या हटके अंदाजात अश्विनचे अभिनंदन केले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - एकेकाळी मैदानावर गोलंदाजांना फटकावणारा भारतीय संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग सध्या टि्वटरवर जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे.  त्याने केलेल्या टि्वटसमुळे तो सतत चर्चेत असतो. त्याच्या हजरजबाबी टि्वटसचे अनेक टि्वटरकरांनी कौतुक देखील केले होते. त्याच्या टि्वटसला अनेकजण रिटि्वट देखील करत असतात. यावेळी त्याने भारताचा ऑफस्पिनर आर.अश्विनला टार्गेट केलं खरं पण त्यामध्ये दोघांच्या पत्नींनी सहभाग घेतल्यामुळे हे संभाषण अधिकचं रोमांचक झालं.

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर सेहवागने मजेशीर टि्वट केले. सेहवागने आपल्या हटके अंदाजात अश्विनचे अभिनंदन केले.

सातव्यांदा मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अश्विनला शुभेच्छा, फक्त विवाहित पुरूषालाच घरी लवकर जाण्याचे महत्त्व समजू शकते, असे मजेशीर टि्वट सेहवागने केले. सेहवागच्या या टि्वटवर अश्विनच्या पत्नीला हसू अनावर झाले. अश्विनच्या पत्नीने सेहवागला त्वरित रिप्लाय देखील दिला. इतकेच नव्हे, तर सेहवागच्या पत्नीनेही टि्वट केले. सेहवागच्या मजेशीर टि्वटची दखल अश्विननेही घेतली. आणि त्याला प्रतिउत्तर दिले. त्यांचे ह संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलां. नेटकरी मंडळींना यामधून मनोरंजन झालं असेल हे मात्र नक्की.

 

दरम्यान, तिसऱ्या इंदूर कसोटीमध्ये आर. अश्विनने दोन्ही डावात मिळून १३ विकेट्स घेतल्या, तर संपूर्ण कसोटी मालिकेत त्याच्या नावावर २७ विकेट्स आहेत. त्याच्या याच कामगिरीबद्दल त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 39 व्या कसोटीत त्याचा हा सातवा मालिकावीर पुरस्कार आहे.