सौरभ पाटीलचे तिहेरी विजेतेपद!

By Admin | Updated: April 14, 2015 02:04 IST2015-04-14T02:04:00+5:302015-04-14T02:04:00+5:30

खार जिमखानाच्या सौरभ पाटीलने एमसीएफ खुल्या दुहेरी टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावताना आपली छाप पाडली.

Saurabh Patil triple championship! | सौरभ पाटीलचे तिहेरी विजेतेपद!

सौरभ पाटीलचे तिहेरी विजेतेपद!

मुंबई : खार जिमखानाच्या सौरभ पाटीलने एमसीएफ खुल्या दुहेरी टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावताना आपली छाप पाडली. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात झालेल्या पुरुष एकेरीचे विजेतेपद देखील सौरभनेच पटकावले होते. त्यामुळे या स्पर्धेवर त्याने एकहाती वर्चस्व गाजवताना ट्रिपल धमाका केला.
बोरीवली येथील मंडपेश्वर सिव्हीक फेडरेशनच्या (एमसीएएफ) वतीने पार पडलेल्या या स्पर्धेत अग्रमानांकित सौरभ - सागर आहुजा या जोडीने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत विजेतेपद पटाकवले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात त्यांनी संदीप धैगुडे - मनवीर रंधवा यांचा ६-०, ६-३ असा धुव्वा उडवला.
मिश्र दुहेरी गटात देखील सौरभने आपला धडाका कायम ठेवला. नूपुर कौलसोबत खेळताना सौरभने चमकदार आगेकूच केलेल्या निशित वकील - अरंतक्ष अ‍ॅण्डे्रडी यांचा ८-० असा फडशा पाडला.
पुरुष वेटरन्स दुहेरी गटात अनिल कपूर - दिनेश कपूर यांनी भूषण अकुत - नीलू डांब्रे यांचे आव्हान ७-६, ३-६, १०-७ असे परतावले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Saurabh Patil triple championship!