शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सरवन घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

By admin | Updated: September 15, 2016 23:22 IST

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार रामनरेश सरवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. सरवान गयानामध्ये त्याची अधिकृत घोषणा करणार आहे.

सेन्ट जोन्स : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार रामनरेश सरवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. सरवान गयानामध्ये त्याची अधिकृत घोषणा करणार आहे. सरवन प्रदीर्घ कालावधीपासून संघातून बाहेर आहे. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध ओव्हलवर खेळला होता. ३६ वर्षीय सरवनने कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना २००० मध्ये बार्बाडोस येथे पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. या व्यतिरिक्त त्याने वन-डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात २००० मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती. सरवनने १८१ वन-डे सामन्यांत ४२.६७ च्या सरासरीने ५८०४ धावा फटकावल्या आहेत. त्याची वन-डेतील सर्वोत्तम खेळी नाबाद १२० आहे. ही खेळी त्याने २०१३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध केली होती. सरवनने राष्ट्रीय संघातर्फे ८७ कसोटी सामने खेळले. त्याने ४०.०१ च्या सरासरीने ५८४२ धावा केल्या. कसोटीमध्ये नाबाद २९१ त्याची सर्वोत्तम खेळी केली. ही खेळी त्याने २००९ मध्ये इंग्लंडविरुद्ध बार्बाडोस येथे केली होती. सरवानने अखेरचा कसोटी सामना भारताविरुद्ध २०११ मध्ये बार्बाडोस येथे खेळला होता. सरवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी फलंदाज ठरला आहे. सरवानने ब्रायन लारानंतर संघाचे नेतृत्व केले, पण त्याला अधिक काळ या पदाचा आनंद घेता आला नाही. त्याने चार कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. (वृत्तसंस्था)