शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशला संजीवनी

By admin | Updated: March 5, 2015 23:23 IST

चार फलंदाजांच्या अर्धशतकांच्या बळावर व्यावसायिक खेळाचा सुंदर नमुना सादर करणाऱ्या बांगलादेशने विश्वचषकात गुरुवारी स्कॉटलंडचा सहा गड्यांनी पराभव केला.

कोएत्झरचे दीडशतक व्यर्थ : स्कॉटलंडवर सहा विकेटनी विजयनेल्सन : तमीम इक्बालच्या नेतृत्वात आघाडीच्या चार फलंदाजांच्या अर्धशतकांच्या बळावर व्यावसायिक खेळाचा सुंदर नमुना सादर करणाऱ्या बांगलादेशने विश्वचषकात गुरुवारी स्कॉटलंडचा सहा गड्यांनी पराभव केला. कोएत्झरच्या १५६ धावांमुळे स्कॉटलंडने ठेवलेले ३१९ धावांचे लक्ष्य बांगलादेशने ४८.१ षटकांत ४ बाद ३२२ असे गाठले. वन डे क्रिकेटमध्ये संघाने गाठलेले हे विक्रमी लक्ष्य ठरले. या विजयामुळे बांगलादेशच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशा जिवंत आहेत.कोएत्झरने १३४ चेंडूंवर १५६ धावा ठोकल्या होत्या, पण स्कॉटलंडच्या पराभवामुळे त्याचा शतकी झंझावात व्यर्थ ठरला. बांगलादेशच्या विजयात तमिम इक्बाल ९५, महमंदुल्लाह ६२, मुशफिकर रहीम ६० आणि शाकिब अल हसन नाबाद ५२ यांनी अर्धशतकी खेळी केली. शब्बीरने जलद नाबाद ४२ धावा केल्या. विश्वचषकात मोठे लक्ष्य गाठण्यात बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे. हा विक्रम आयर्लंडच्या नावावर आहे. आयर्लंडने इंग्लंडविरुद्ध २०११ मध्ये ३२८ धावांचे लक्ष्य गाठले होते. बांगलादेशचे चार सामन्यांत पाच गुण झाले असून ‘अ’ गटात हा संघ चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध अद्याप सामने खेळायचे आहेत. यापैकी एक विजय मिळाल्यास बांगलादेशचे उपांत्यफेरीमध्ये स्थान निश्चित होईल. स्कॉटलंडने विश्वचषकात अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. तिसऱ्यांदा स्पर्धेत खेळणाऱ्या या संघाने सर्व १२ सामने गमावले. सध्या चारही सामन्यांत हा संघ पराभूत झाला आहे. बांगलादेशने याआधी विश्वचषकात कधीही ३०० धावा केल्या नव्हत्या. आजही सौम्या सरकार (२) हा झटपट बाद झाल्यानंतर तमीम आणि महमंदुल्लाह यांनी दुसऱ्या गड्यासाठी १३९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर तमीमने तिसऱ्या गड्यासाठी मुशफिकरसोबत ५७ धावा ठोकल्या. तमीम विश्वचषकात पहिले शतक साजरे करणार तोच २५ वर्षांच्या या फलंदाजाला डेव्हीने पायचित केले. त्याने १०० चेंडू खेळले. त्यात नऊ चौकार व एक षट्कार होता. मुशफिकरने ४२ चेंडूंत सहा चौकार व दोन षट्कारांसह ४२ धावा केल्या. रहमान आणि शाकिब यांनी पाचव्या गड्यासाठी नाबाद ७५ धावा ठोकून लक्ष्य गाठले. शाकिबने ४१ चेंडूंत पाच चौकार व एक षट्कार तसेच रहमानने ४० चेंडू खेळून चार चौकार व दोन षट्कार खेचले. त्याआधी स्कॉटलंडच्या डावाला कोएत्झरने आकार दिला. करिअरमधील दुसऱ्या शतकाची नोंद करणाऱ्या कोएत्झरलाच ‘सामनावीरा’चा पुरस्कार बहाल करण्यात आला. (वृत्तसंस्था)१५६कोएत्झरने केलेल्या आजच्या धावा या कसोटी दर्जा नसलेल्या संघातील खेळाडूच्या वर्ल्डकपमधील सर्वोच्च धावा आहेत. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकात नेदरलॅँडच्या जान वॅन नोर्टूविज्क याने १३४ धावा केल्या होत्या.१४१धावांची भागीदारी कोएत्झर आणि प्रेस्टन मोमसेन यांनी आज नोंदविली. स्कॉटलंडकडून वर्ल्डकपमध्ये झालेली ही सर्वोच्च भागीदारी आहे.स्कॉटलंड : काईल कोएत्झर झे. सरकार गो. नासिर हुसेन १५६, मॅक्लॉईड झे. महमंदुल्लाह गो. मूर्तझा ११, हामिश गार्डिनर झे. सरकार गो. तास्किन अहमद १९, मॅट मचान झे. आणि गो. रहमान ३५, प्रेस्टन मोमसेन झे. सरकार गो. नासिर हुसेन ३९, रिची बॅरिंग्टन झे. रहीम गो. तास्किन अहमद २६, मॅथ्यू क्रॉस झे. शब्बीर गो. तास्किन अहमद २०, जोस डेव्ही नाबाद ४, माजिद हक झे. सरकार गो. शकिब हसन १, इव्हान्स नाबाद ००, अवांतर ७, एकूण : ५० षटकांत ८ बाद ३१८ धावा. गडी बाद क्रम : १/१३, २/३८, ३/११६, ४/२५७, ५/२६९, ६/३१८, ७/३१२, ८/३१५. गोलंदाजी : शकिब अल हसन १०-०-४६-१, तास्किन अहमद ७-०-४३-३, रुबेल हुसेन ८-०-६०-०, महमंदुल्लाह ५-०-२९-०, शब्बीर रहमान ७-०-४७-१, नासिर हुसेन ५-०-३२-२.बांगला देश : तमिम इक्बाल पायचित गो. डेव्ही ९५, सौम्या सरकार झे. क्रॉस गो. डेव्ही २, महमंदुल्लाह त्रि. गो. वार्डलॉ ६२, मुशफिकर रहीम झे. मॅक्लॉईड गो. इव्हान्स ६०, शाकिब अल हसन नाबाद ५२, शब्बीर रहमान नाबाद ४२, अवांतर : ९. एकूण : ४८.१ षटकांत ४ बाद ३२२ धावा. गडी बाद क्रम :१/५, २/१४४, ३/२०१, ४/२४७. गोलंदाजी : वार्डलॉ ९.१-०-७५-१, डेव्ही १०-०-६८-२, इव्हान्स १०-१-६७-१, मचान ७-०-४५-०, हक १०-०-४९-०, बॅरिंग्टन २-०-१८-०.