सानियाचा डबल धमाका

By Admin | Updated: January 24, 2016 02:22 IST2016-01-24T02:22:42+5:302016-01-24T02:22:42+5:30

जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू भारताच्या सानिया मिर्झाने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखताना महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या

Sania's double explosion | सानियाचा डबल धमाका

सानियाचा डबल धमाका

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू भारताच्या सानिया मिर्झाने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखताना महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
महिला दुहेरीतील सामन्यात सानियाने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससह खेळताना लुडमिया किचनोक आणि नादिया किचनोक या युक्रेनच्या खेळाडूंवर ६-२, ६-३ अशी मात करीत अंतिम १६ खेळाडूंमध्ये आपली जागा पक्की केली. मिश्र दुहेरीत अव्वल मानांकनप्राप्त सानिया मिर्झा व क्रोएशियाचा जोडीदार इवान डोडिग या जोडीने जबरदस्त खेळ करताना अजला टोमालानोविच व निक किर्गीयोस या आॅस्ट्रेलियन खेळाडूंना ७-५, ६-१ अशा फरकाने धूळ चारत स्पर्धेत आगेकूच केली.
दुहेरीतील महिला गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया आणि हिंगीस या अव्वल मानांकनप्राप्त जोडीला रशियाची स्वेतलाना कुझ्नेत्सोवा आणि इटलीची रॉबर्टा विंची यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, तर मिश्र दुहेरीत सानिया आणि डोडिग यांना कजाकिस्तानच्या यारोश्लावा श्वेदोवा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी जोडीशी झुंज द्यावी लागेल.

Web Title: Sania's double explosion