रोम : भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची तिची जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी रविवारी येथे एका संघर्षपूर्ण सामन्यात इकटेरिनाम मकरोव्हा आणि इलेना वेसनिना या जोडीचा पराभव करीत डब्ल्यूटीए इटालियन ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या जोडीचे क्ले कोर्टवरील हे पहिले विजेतेपद ठरले.सानिया आणि हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने मकरोव्हा आणि वेसनिना या सातव्या मानांकित रशियन जोडीवर दीड तास रंगलेल्या लढतीत ६-१, ६-७, १0-३ असा विजय मिळवला. फेब्रुवारीनंतर त्यांनी आपले पहिले विजेतेपद पटकावले. विम्बल्डन, यूएस ओपन आणि आॅस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या सानिया आणि हिंगीस यांचे लक्ष आता फ्रेंच ओपन जिंकून सलग चार ग्रँडस्लॅम जिंकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याकडे आहे. सानियाचे हे ३७ वे दुहेरी विजेतेपद आहे तर हिंगीसने ५५ वे अजिंक्यपद पटकावले. या दोघींचे या सत्रातील पाचवे विजेतेपद आहे.
सानिया-हिंगीस अजिंक्य
By admin | Updated: May 16, 2016 04:23 IST
सानिया आणि हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने मकरोव्हा आणि वेसनिना या सातव्या मानांकित रशियन जोडीवर दीड तास रंगलेल्या लढतीत ६-१, ६-७, १0-३ असा विजय मिळवला
सानिया-हिंगीस अजिंक्य
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}